या व्हायरल फोटोतील मुलगी आहे तरी कोण आणि काय आहे तिची गोष्ट ?

हातात सलाईन घेतलेली एक लहान मुलगी सध्या चर्चेत आहे. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी तिने सलाईनची बाटली आपल्या उंची पेक्षा जास्त अंतरावर धरलेली दिसत आहे. ही मुलगी आहे तरी कोण आणि तिच्यावर ही वेळ का आली ? चला जाणून घेऊ....

काय आहे या फोटो मागची गोष्ट ?

या मुलीचं नाव आहे धृपदा (वय-सात वर्ष). तिच्या वडिलांना औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील शासकीय रुग्णालयात शनिवारी दाखल केलं होतं. सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी धृपदाच्या हातात सलाईनची बाटली सोपवली. खाटेपाशी स्टॅण्डची व्यवस्था नसल्याने बाटली धरून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.

स्रोत

ऑपरेशन थिएटर ते वॉर्ड मध्ये येईपर्यंत सलाईनची बाटली तिने हातात धरून ठेवली होती. वॉर्ड मध्ये आल्यानंतरही स्टॅण्डचा पत्ता नसल्याने तिला तब्बल अर्धा तास टाचा वर करून त्याच अवस्थेत उभं राहावं लागलं. शेवटी अर्ध्या तासानंतर तिच्या भावाने स्टॅण्ड शोधून आणला तेव्हा तिची या कामातून सुटका झाली.

मंडळी, ध्रुपदाला आई नसल्याने ती आणि तिचा भाऊ वडिलांची काळजी घेत आहेत. आपल्या वडिलांच्या काळजी पोटी तिने जे केलं त्याची सगळीकडून प्रशंसा होत आहे. हा फोटो आणि तिची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर सरकारी रुग्णालयांच्या कामावर प्रश्न उभे केले गेलेत.

एकंदरीत, यातून शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required