computer

उन्हाळा लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव !!

डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. मंडळी, उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याचबरोबर जळजळ, मुत्रानालीकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे. हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात उद्भवतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असते.

मंडळी आज शनिवार स्पेशल मध्ये आपण बघणार आहोत उन्हाळी लागण्याची करणे आणि त्यावरचे घरघुती उपाय !!

कारणे !

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कामी होतं. पाणी कमी झाल्याने लघवीत क्षारचं प्रमाण वाढतं. म्हणजेच शरीरात पाणी नसल्याने ‘उन्हाळी लागते’. स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या प्रकारे असतो.

पुरुषांमध्ये  लघवीला व मुत्रानालीकेत आणि जळजळ व आग होण्यासारखी लक्षणे दिसतात तर स्त्रियांमध्ये हीच लक्षणे काही प्रमाणात तीव्र असतात. स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याबरोबरच कळ येणे आणि रक्तस्त्रावाचा त्रास होतो. यापासून लहान मुलंही वाचलेली नाहीत राव.

मंडळी, या समस्येवर काही घरघुती उपाय आहेत. चला तर बघुयात !!

उपाय

१. पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे ‘भरपूर पाणी प्या.’

२. खाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्यास त्रास कमी होतो.

३. शहाळ्याचे पाणी प्या.

४. धने, जिरे, बडीशेप भिजवून, कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा व त्यात खडीसाखर घालून प्यावे.

५. कलिंगडचा रस प्या.

६. नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून प्या.

७. नीरा प्यायलाने देखील फायदा होतो.

८. आमसुलाचे पाणी, कोकम सरबत साखर घालून प्यावे.

९. कैरीचे पन्हे वेलदोडा घालून प्यावे.

१०. पुदिन्याचे पाणी प्या !!

मंडळी, वरील उपाय करूनही त्रास कमी होत नसेल तर थेट डॉक्टरांकडे जाणच चांगलं. काहीवेळा अशा प्रकारचा त्रास इतर कारणांमुळे होऊ शकतो.

एकंदरीत या उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या कारण सूर्य भयानक तापलाय भौ !!

 

आणखी वाचा :

जिभेची जखम पटकन बरी होण्याचं हे आहे रहस्य !!

उचकी थांबवण्याचे ६ सॉल्लिड उपाय, यातला तुम्ही कोणता अंमलात आणता ?

सबस्क्राईब करा

* indicates required