चक्क झोपण्यासाठी १२ लाख रुपये मिळतील ?...नासा मधल्या या अनोख्या नोकरीबद्दल माहित्ये का ?

राव, तुम्ही रात्री ८ तास किंवा ९ तास झोपा पण सकाळच्या ५ मिनिटाच्या झोपेची सर कोणत्याच झोपेला नाही. हे आळशी लोकांना लगेच समजेल !! मंडळी, तुम्हाला झोप अत्यंत प्रिय आहे का ? झोप ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट आहे का ? उत्तर जर ‘हो’ असेल तर आज आम्ही तुमच्या फायद्याची गोष्ट घेऊन आलो आहोत.

मंडळी, झोपायचंच आहे ना मग तुम्ही ‘नासा’ मध्ये जाऊन का झोपत नाहीत ? नासावाले तर झोपण्यासाठी चक्क पैसे सुद्धा देत आहेत....आता तुम्हाला वाटेल की आम्ही हा लेख झोपेत वगैरे लिहिला असेल. तर तसं काही नाहिए. नासावाले खरच तुम्हाला झोपण्यासाठी पैसे देणार आहेत.

स्रोत

त्याचं काय आहे ना, अंतराळवीरांना अंतराळात गेल्यानंतर मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणरहीत वातावरणात राहवं लागतं. त्यामुळे नासाचे शास्त्रज्ञ ‘बेड रेस्ट स्टडी करत’ आहेत. या संशोधनातून त्यांना गुरुत्वाकर्षणरहीत वतावरणात शरीरात काय बदल होतात याचा अभ्यास करायचा आहे.

तर यासाठी त्यांनी चक्क माणसांना नवीन नोकरी देऊ केली आहे. या नोकरीत माणसांना फक्त झोपायचं आहे. हा झोपेचा काळ तब्बल १२० दिवस म्हणजे ४ महिने असेल. या बदल्यात मिळणार आहेत तब्बल १९००० डॉलर्स. म्हणजेच जवळजवळ १२ लाख रुपये. आहे की नाही भन्नाट ? हे वाचून जर तुम्हाला वाटलं असेल की ही नोकरी आपण करू शकतो तर पुढील माहिती सुद्धा वाचून घ्या आणि मग विचार करा.
या कामासाठी निवडलेल्या व्यक्तींचे २ समूह केले जातात. एक असतो एक्सरसायजिंग सब्जेक्ट आणि दुसरा असतो नॉन एक्सरसायजिंग सब्जेक्ट. या दोन्ही समूहाला घेऊन ३ टप्प्यांमध्ये संशोधन होतं.

स्रोत

१. पहिल्या टप्प्यात व्यक्तीला सामान्य पद्धतीने झोपू दिलं जातं. 
२. दुसऱ्या टप्प्यात फक्त झोपून राहावं लागतं.
३. तिसऱ्या टप्प्यात डोकं थोडं खाली आणि पाय वरती ठेवून झोपावं लागतं.

मंडळी, आता वाचूयात या नोकरीचे नियम काय आहेत ते.

स्रोत

या नोकरीसाठी माणसं निवडताना नासा काही नियम लागू करतं. पहिला नियम म्हणजे तुमची फिजिकल फिटनेस एखाद्या अंतराळवीरासारखी असली पाहिजे आणि दुसरा नियम म्हणजे नासाने ठरवलेली विशिष्ट टेस्ट पास झाला पाहिजेत. या सगळ्यातून पास झालात तरी नोकरीचे आणखी काही नियम आहेत. ते सुद्धा बघून घ्या.

१. धुम्रपान केलेलं चालणार नाही. तसेच मद्यपान आणि चहा सारखे पेय घेऊ दिलं जाणार नाही.
२. अवकाशात गेल्यानंतर सामान्य अंतराळवीराला जे अन्न दिलं जातं तेच अन्न तुम्हालाही खावं लागेल. महत्वाचं म्हणजे या जेवणात मीठ नसेल.

स्रोत

४. जेवणाच्या बाबतीत हे संशोधन फार काटेकोर आहे. अवेळी खाणे किंवा अर्धवट खाणे चालणार नाही.
५. अंघोळी पासून जेवणापर्यंत सगळं काही झोपून करावं लागेल कारण जास्तीत जास्त वेळ हा झोपून काढायचा असतो.

 

स्रोत

६. झोपण्याची नोकरी असल्याने कामाच्या वेळेव्यतिरिक्त झोपलेलं चालणार नाही.
७. सकाळी ६ वाजता उठून रात्री १० वाजेपर्यंत जागं राहावं लागेल. 
८ . कोणालाही भेटू दिलं जाणार नाही.

तर मंडळी, हे नियम वाचून सुद्धा तुम्हाला जर ही नोकरी करायची असेल तर नासाच्या वेबसाईटला आताच भेट द्या. ही नोकरी दिसते सोप्पी पण आहे कठीण. निवड तुमची आहे !!

 

आणखी वाचा :

अशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था !!

या बाई चक्क दोन वर्षे अंतराळात राहिल्या आणि सर्वाधिक काळ अंतराळात राह्ण्याचा केला विक्रम

फोटो: २० वर्षांनी कासिनी उपग्रहाने काल घेतली शनी ग्रहावर कायमची झोप...पाहा उपग्रहाची २० वर्षांतली कामगिरी..

सबस्क्राईब करा

* indicates required