वयाच्या ७० व्या वर्षी तब्बल ३३ फुट विहीर खोदणारे कोण आहेत हे आजोबा ?

वयाच्या ७० व्या वर्षी जिथे माणसं अंथरुणाला खिळलेली असतात तिथे एक माणूस पाण्याची समस्या सोडवण्यासाठी चक्क विहीर खणत आहे. राव, पाणीटंचाईच्या समस्येने गाव ग्रासलेलं असताना शांत बसण्यापेक्षा या समस्येला सोडवण्यासाठी या आजोबांनी कंबर कसली आहे. त्यांच्या अडीच वर्षाच्या अथक प्रयत्नातून तब्बल ३३ फुट खोल विहीर खणून त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. चला जाणून घेऊया या बुजुर्ग बहाद्दराबद्दल....

सीताराम राजपूत नावाचे ७० वर्षांचे आजोबा सध्या मध्यप्रदेशातील हडुआ गावात विहीर खणत आहेत. गावात गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न सतावतोय. गावकऱ्यांनी याबद्दल सरकारकडे मदत मागितली पण काहीच प्रतिसाद आला नाही. सरकारचं थंड काम सुरु असताना गावकऱ्यांनी या समस्येसाठी काहीही केलं नाही. ते सरकारच्या मदतीची वाट बघत राहिले. पण गावातले बुजुर्ग सीताराम राजपूत यांनी शांत बसण्यापेक्षा लढण्याला महत्व दिलं.

गावासाठी विहीर खोदण्याची जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा गावकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना वेड्यात काढलं. हे काम होऊ शकणार नाही यावर गावकऱ्यांचा विश्वास होता. पण सीताराम यांनी अडीच वर्षात अशक्य सुद्धा शक्य करून दाखवलं.

मंडळी, जे काम संपूर्ण गावाने मिळून काही महिन्यात पूर्ण केलं असतं त्यासाठी सीताराम अडीच वर्ष झटावं लागत आहे. आज जेव्हा या कामाची पूर्तता झाली आहे तर गावात सीताराम यांच्या नावाचे गोडवे गायले जात आहेत.

यातून एक गोष्ट तर सिद्ध झाली; जिद्द असली की वयाची बंधने येत नाहीत.

 

आणखी वाचा :

वाचा, हा २५६ वर्षांचा माणूस मरताना काय म्हणाला !!

सबस्क्राईब करा

* indicates required