computer

भारतातल्या घटस्फोटांची ही ८ विचित्र कारणं माहित आहेत का ?

पुण्यात एका पत्नीने आपल्या इंजिनियर पती विरोधात घटस्फोट मागितला आहे. घटस्फोटाचं कारण देखील थोडं विचित्र आहे. पत्नीचं म्हणणं आहे की तिचा नवरा जवळजवळ हिटलर आहे. त्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ही नियमानुसार काटेकोर पद्धतीने झाली पाहिजे. याचं एक उदाहरण बघा. त्याच्या मते चपातीचा आकार २० सेमी पेक्षा जास्त झाला नाही पाहिजे. त्याच बरोबर दिवसभरात काय काय केलं, किती खर्च झाला हे एका एक्सेलशीट मध्ये लिहून ठेवलं पाहिजे. पूर्ण झालेली कामे, अपूर्ण असलेली कामे आणि काय काम केले याचा तपशील दिला पाहिजे. जर तसं लिहिलं नाही तर का लिहिलं नाही याचं कारण लिहून ठेवलं पाहिजे.

मंडळी त्याच्या नियमाप्रमाणे न वागल्यास तिला शिक्षा म्हणून तो डांबून ठेवायचा, मारहाण करायचा. या सगळ्यांना कंटाळून तिने शेवटी घटस्फोट मागितला आहे.

मंडळ, घटस्फोट घेण्यामागचं हे एक विचित्र कारण नुकतच समोर आलं असलं तरी ही काही पहिली वेळ नाही. आपल्या देशात अशी अनेक उदाहरणं आहेत

चला तर आज या निमित्ताने पाहूयात घटस्फोटाची १० विचित्र उदाहरणं.

१. करवाचौथ

उत्तर भारतात करवाचौथच्या दिवशी पत्नीने पतीच्या पाया पडायचे असते. काही मुलींना ही समाज रीत मान्य नसते आणि त्या नवऱ्याच्या पाया पडण्यापेक्षा घटस्फोट घेणे पसंत करतात.

२. चेहरा

मुंबई मध्ये एका जोडप्याच्या घटस्फोटाचे कारण होते बायकोच्या चेहऱ्यावर असलेली मुरुमे. चेहऱ्यावर मुरुमे असल्यामुळे मुलींचा आत्मविश्वास कमी होणं साहजिक आहे पण हे घटस्फोटाचं कारण फारच विचित्र आहे.

३. जेवण

आईच्या हातच्या जेवणाची चव इतर कोणत्याही जेवणाला नसते असं म्हणतात पण म्हणून बायकोला घटस्फोट दिल्याची अनेक उदाहरणं घडली आहेत.

४. लहान घर

भारतात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे पत्नीने पतीला त्याच्या लहान घरामुळे घटस्फोट दिला आहे. माहेरच्या घराच्या मानाने पतीचं घर अगदी लहान असल्याची तक्रार यावेळी करण्यात येते.

५. चहा नाही केला म्हणून

ही घटना आहे १९८५ सालची. आपल्या मित्रांसाठी चहा केला नाही म्हणून एका पतीने पत्नीकडे घटस्फोट मागितला होता. या बरोबर आणखी एक गंभीर आरोप म्हणजे पत्नीने पतीला न विचारता गर्भपात केला होता.

६. मांसाहारी जेवण

मुलगी जैन आणि मुलगा राजपूत. तिला मांसाहार निषिद्ध आणि तो मांसाहार खाणारा. त्याने तिला लग्नाआधी म्हटलं होतं की तो मांसाहारी खाणं सोडेल पण त्याने लग्नानंतर आपलं वाचन पाळलं नाही म्हणून पत्नीने घटस्फोट मागितला. गंमत म्हणजे हा त्यांचा प्रेम विवाह होता.

७. कपडे

पत्नी ऑफिससाठी जे कपडे वापरते ते न आवडल्यामुळे पतीने घटस्फोट मागितल्याची घटना २०१४ मध्ये घडली होती. पतीच्या मते पत्नीने पारंपारिक कपड्यांमध्ये घराबाहेर पडलं पाहिजे.

८. लैंगिक संबंध

पतीकडून अती अतिरिक्त लैंगिक सुखाची मागणी हा मुद्दा एखाद्या स्त्रीच्या वैवाहिक सौख्यात बाधा आणू शकतो पण नुकतीच एक घटना अशी घडली आहे की पत्नीच्या अतिरिक्त सुखाच्या मागणीला कंटाळून पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे.

 

तुम्हांला घटस्फोटाची अशी काही अतरंगी कारणं माहित आहेत का ? अहो, मग आम्हांलाही सांगा की राव...

सबस्क्राईब करा

* indicates required