भारतातल्या या गावात सगळेच कसे काय करोडपती ??

अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यातील एक लहानसं गाव “बोमजा”. हे गाव सध्या चर्चेत आहे तिथल्या लोकांना मिळालेल्या पैशांमुळे. या गावातील प्रत्येक घर आज करोडपती आहे. भाऊ, करोडपती म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल ४ ते ६ करोडचे मालक आहेत हे लोक.

पण अचानक एवढ्या पैश्यांचा पाऊस पडला कसा ?

त्याचं असं झालं की, भारत चीन युद्धानंतर तवांगला मिळालेल्या महत्वामुळे या जिल्ह्यात लष्कराची छावणी उभारण्याचं ठरलं होतं. त्यानुसार भारताच्या संरक्षण मंत्रालयाने बोमजा गावातील २०० एकर जमीन अधिग्रहण केली. खरं तर जमीन अधिग्रहण होऊन ५ वर्ष पूर्ण झाली आहेत पण या बाबतीत निकाल काही दिवसांपूर्वी लागला.

निकाल लागल्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ‘पेमा खांडू’ यांनी जमीन अधिग्रहणाच्या बदल्यात या गावात एकूण ४० कोटी ८० लाख ३८ हजार ४०० रुपये मोबदला म्हणून वाटले आहेत. एकूण ३१ जमीन धारकांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात हा मोबदला मिळाला. यात सर्वात जास्त रक्कम होती ६ कोटी ७३ लाख २९ हजार ९२५ रुपये तर सर्वात कमी रक्कम होती १ कोटी ९ लाख ३ हजार ८१३ रुपये.

अश्या रीतीने बोमजा गाव रातोरात संपूर्ण आशियातील श्रीमंत गावांच्या यादीत सामील झालं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required