औरंगाबादच्या गावातली मुलं आजही १४ किलोमीटरचा प्रवास करून गावात पाणी आणत आहेत !!

महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. जून महिन्यात पाऊस पडण्यासाठी साकडे घालणारी लोक पाऊस थांबावा म्हणून विनंती करत आहेत. पण अजूनही काही परिसर असे आहेत जिथे पाऊस पडलेला नाही. ते परिसर आजही दुष्काळग्रस्त आहेत.
असेच एक गाव आहे मुकुंदवाडी. तिथे अजूनही पाऊस आलेला नाही. गावात पिण्याचे पाणी सुद्धा पुरेसे नाही. या संकटावर मात करण्यासाठी तिथल्या लहान मुलांनी कंबर कसली आहे. ते थेट रेल्वेत प्रवास करून गावात पाणी आणत आहेत!!
९ वर्षाची साक्षी गरुड आणि १० वर्षाचा सिद्धार्थ ढगे आणि अजून काही गावातील लहान मुले रोज १४ किलोमीटर रेल्वेचा प्रवास करून गावात पाणी आणतात.
या गावात वर्षानुवर्षे दुष्काळ आहे. या मुलांची कुटुंबे गरीब आहेत त्यांना टँकर परवडत नाही. अश्यावेळी शाळा सोडून त्यांना हे काम करावे लागत आहे. ती मुले सांगतात की त्यांना पण हे काम करण्याची हौस नाही पण पर्याय नसल्याने हे काम करावे लागते.
एकीकडे जोरदार पाऊस असूनही महाराष्ट्रातील मोठ्या भागात अशी परिस्थिती आहे राव!!
लेखक : वैभव पाटील.