f
computer

गुगल मॅप्सच्या सल्ला घेतला म्हणून त्याच्यावर पश्चातापाची वेळ का आली ? काय घडलं बघा !!

राव, गुगल मॅप्समुळे पत्ता शोधणं एकदम सोप्पं झालं आहे. ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे ते ठिकाण आणि आपल्यात किती अंतर आहे इथपासून ते तिथे पोहोचायला किती वेळ लागेल, रस्त्यात ट्राफिक आहे का इथपर्यंत अगदी सहज समजतं. यामुळे हरवण्याची आणि पत्ते विचारायची झंझटही संपली आहे. पण काहीही झालं तरी आपण गुगल मॅप्सवर पूर्ण विसंबून राहू शकत नाही. का ? हे ताजं उदाहरण वाचा !!

झालं असं, की ऑस्ट्रेलियातला ब्रूस नावाचा व्यक्ती कॅम्पिंगसाठी आपल्या मित्रांना भेटायला जात होता. रस्त्यात त्याला गुगल मॅप्सने पुढून ‘शॉर्टकट’ घ्यायचा सल्ला दिला. गुगल मॅप्स प्रमाणे या शॉर्टकटने तो अवघ्या १५ मिनिटात पोहोचू शकणार होता. आता एवढ्या चांगल्या शॉर्टकटला कोणी का सोडेल. ब्रूसनेही गुगलचं ऐकून तो रस्ता धरला आणि नंतर त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ आली.

मंडळी, ब्रूसला मित्रांपर्यंत पोहोचायला तब्बल २ तास लागले. गुगलने सुचवलेला रस्ता हा एका जंगलातून जाणारा होता. जो पर्यंत ब्रूसला आपल्या चुकीबद्दल समजलं तोवर फार उशीर झाला होता. रस्ता अरुंद असल्याने त्याला मागे फिरणेही शक्य नव्हते. मित्रांना फोन करावं म्हटलं तर जंगलात ‘रेंज’ची बोंब. त्याच जंगलातून प्रवास करत तो एका टेकडीवर पोहोचल्यानंतर त्याने मित्रांना संपर्क केला.

मंडळी, गुगल मॅप्सने सुचवलेले शॉर्टकट गांभीर्याने घेतले तर काय परिणाम होतात हे ब्रूसला कळून चुकलं. पण त्याला एक फायदा पण झाला. त्याला या प्रवासात जंगल सफारीचा मस्त आनंद लुटता आला. त्याने प्रवासात घेतलेले हे फोटोग्राफ्स पाहा !!

सबस्क्राईब करा

* indicates required