नवीन वर्षात भारताचा विक्रम...१ जानेवारीला जन्मली तब्बल इतकी मुलं !!

मंडळी, भारताने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जागतिक विक्रम केला आहे. या रेकॉर्डचा आनंद साजरा करायचा की दुःख ? ते आता तुम्हीच ठरवा.

मंडळी, २०१९च्या पहिल्याच दिवशी भारतात जवळजवळ ७०,००० बालकांचा जन्म झाला. २०१९ सालचा भारताच्या नावावर झालेला हा पहिलाच रेकॉर्ड म्हणता येईल. एका अहवालातून जगभरात १ जानेवारी रोजी ३,९५,००० मुलांचा जन्म होण्याची शक्यता होती. यातील तब्बल १८ टक्के मुलं भारतात जन्मली आहेत. हा आकडा इतर कोणत्याही देशांपेक्षा मोठा आहे.

राव, तशी शक्यताही होतीच. अग्रगण्य अशा ४ देशांच्या यादीत आपलं नाव घेतलं जात होतं. भारत, चीन, अमेरिका आणि बांगलादेश ही ती ४ नावे. वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत हा सर्वात जास्त बालकांना जन्म देणारा देश ठरला, तर फिजी हा बालकांना जन्म देणारा पहिला देश ठरला आहे. शेवटचा क्रमांक हा अमेरिकेचा आहे.  

मंडळी, युनिसेफनुसार (UNICEF) दरदिवशी तब्बल ६९,००० मुलांचा जन्म होतो. हा दिवस नवजात बालक आणि आई दोघांसाठी कसोटीचा दिवस समजला जातो. अर्धा टक्के मातांचा यादिवशी मृत्यू होतो तर ४० टक्के नवजात बालकांना पुढचं आयुष्य लाभत नाही.

तर मंडळी, भारताचा हा विक्रम आपल्याला काय सांगतोय ? आपली लोकसंख्या जोमाने वाढत आहे राव !!

 

आणखी वाचा :

या जोडप्याने आपल्या बाळाला १६१६ इंजेक्शन्सच्या मध्ये का झोपवलं ?? कारण जाणून घ्या !!

झोपेत बाळ का हसतं ? हे आहे या मागचं वैज्ञानिक कारण !!

गोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते ? हे आहे वैज्ञानिक उत्तर !!

आपण बाळाला नेहमी डाव्या बाजूलाच का घेतो ? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण !!

डोहाळेजेवण साजरे करण्याच्या ५ वेगवेगळ्या पद्धती

छकुल्याच्या छकुलीचं बारसं...पाहा एकदम मराठमोळं असं काय नांव ठेवलंय ते !!

लहान बाळाच्या सर्दीपडश्यावर घरच्या घरी सोपे चार उपाय

सबस्क्राईब करा

* indicates required