computer

वजन कमी करायचंय?? रताळे खा.. वाचा रताळे खाण्याचे ५ अफलातून फायदे!!!

तुम्ही वजन कमी करताय? मग आम्ही एक आयडिया सुचवू का? तुम्ही रताळे का नाही ट्राय करत?? अहो, का म्हणून काय विचारताय?  हे कंद तुमचं वजन कमी करण्यासाठी अगदी उत्तम आहे. रताळे पौष्टिक असतं हे तर तुम्ही ऐकलं असेलच, पण त्याचा वजन कमी करण्यासाठी कसा उपयोग होतो ते आम्ही सांगू.

चला आज जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी रताळे कसे फायदेशीर आहे ते.

१. रताळे फायबर्सने भरलेले असते. या फायबर्समुळे पोटाला चकवता येतं. आपल्याला पोट भरल्याचा भास होतो. परिणामी भूक कमी होते आणि वजन कमी होतं.

२. रताळ्यात Resistant Starch (पिष्टमय पदार्थाचा प्रकार) हा घटक असतो. Resistant Starch आपल्या शरीरातील अतिरिक्त मेद (चरबी) कमी करण्याचं काम करतो. सोबतच तयार होणाऱ्या नवीन मेदावारही नियंत्रण आणतो.

३. वजन वाढण्यात अन्नातल्या कॅलरीजचा सर्वात मोठा वाटा असतो. रताळ्यात कॅलरीजचं प्रमाण प्रत्येकी १०० ग्राम मागे फक्त ८६ एवढं कमी असतं.  

४. ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये रताळे खालच्या स्थानावर आहे. आधी तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय ते समजून घेऊ. हा अन्नपदार्थांना दिला जाणारा क्रमांक आहे. एखादं अन्न खाल्ल्यानंतर त्याचा आपल्या रक्तातल्या ग्लुकोजच्या प्रमाणावर काय परिणाम होतो त्यावरून हा क्रमांक ठरवला जातो. रताळे या लिस्ट मध्ये अगदी तळाशी आहे. याचा अर्थ रताळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवत नाही. सोबतच याचाच फायदा वजन आटोक्यात आणण्यासाठी होती. या गुणधर्मामुळे रताळे डायबेटीसच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते. एक मात्र इथे लक्षात घ्यायला हवं, ग्लायसेमिक इंडेक्स अन्न शिजवण्याच्या पद्धतीनुसार बदलत राहतो.

५. रताळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. या गुणधर्मामुळे डिहायड्रेशन (निर्जलीकरण) होत नाही. डिहायड्रेशनमुळे चयापचय क्रियेवर होणारा दुष्परिणाम टाळला जातो.

मंडळी, फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर रताळ्याचे इतर अनेक फायदे आहेत. जसे की रताळ्याचे उकळलेले पाणी त्वचेसाठी उत्तम असते, रताळ्यात असलेल्या व्हिटॅमिन B6 हृदयासाठी फायदेशीर असते, याखेरीज कर्करोगाला प्रतिबंध म्हणूनही रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो.

सबस्क्राईब करा

* indicates required