अशी दिसायची ९० वर्षांपूर्वी मुंबई....सांगा बरं काय काय बदल झाला आहे?

मुंबई म्हटलं की काय आठवतं तर तिथली गर्दी. मग ती लोकल मधली असो वा रस्त्यावरची. गर्दी, गाड्या, सतत धावपळीतली माणसं, दक्षिणेतली मुंबई वेगळी, दादर-परळ भागातली मुंबई वेगळी, ठाण्याला लागून असलेली मुंबई वेगळी, हे मुंबईचं आजचं रूप. मुंबई अनेकांचं पालनपोषण करते म्हणजे तिचं असं अस्ताव्यस्त रूप हे अपरिहार्य आहे.

स्रोत

आज आम्ही मुंबई बद्दल का सांगत आहोत ? मंडळी, त्याचं काय आहे ना, ‘guy jones’ या युट्युब चॅनेलने मुंबईचा १९२९ सालचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. म्हणजे आजपासून तब्बल ९० वर्षांपूर्वीची मुंबई यात आपण पाहू शकतो. आता आपल्याला सहज वाटेल की त्यावेळीची मुंबई म्हणजे काय मुंबई होती, एवढी गर्दी त्यावेळी कुठे !! पण व्हिडीओ काहीतरी वेगळंच सांगत आहे. पाहा तर !!

मंडळी, व्हिडीओ पाहून एवढंच वाटतं की मुंबई काल पण तशीच होती आणि आजही तशीच आहे आणि कदाचित पुढे अनेक वर्ष तशीच राहील. मुंबईतली गर्दी ही त्याकाळीही होती आणि आजही आहे. बदल झालाय तो फक्त वाहनांचा. बैलगाडी, टांगा यांची जागा कार, बाईक्सने घेतली आहे. माणसांचा आवाज नीट ऐकला तर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषा ऐकू येतील. म्हणजे मुंबईत आज जी भाषेची भेळ ऐकू येते त्याची परंपरा इतकी जुनी आहे राव.

व्हिडीओ सोबत दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य ११ जानेवारी, १९२९ सालचं आहे. पण कालचंच फुटेज वाटावं इतका व्हिडीओचा दर्जा उत्तम आहे. यामुळेच की काय व्हिडीओच्या अस्सलपणाबद्दल शंका वाटू शकते. पण त्यालाही सबळ उत्तर आहे. त्याकाळी अत्याधुनिक असलेल्या Movietone sound प्रणालीमुळे आवाज अगदी चांगल्याप्रकारे रेकॉर्ड झाला आहे. हीच प्रणाली त्याकाळातल्या सिनेमांमध्ये वापरली जायची. व्हिडीओ आणखी स्पष्ट दिसावा म्हणून त्याच्यावर आजच्या तंत्रज्ञानाचे संस्कारही करण्यात आले आहेत.

तर मंडळी, कशी वाटली ९० वर्षापूर्वीची मुंबई ? सांगा बरं !!

 

आणखी वाचा :

मुंबईचा दानशूर कर्ण -  ‘जेजे हॉस्पिटल’ ला ज्यांचे नाव दिलयं असे सर जमशेटजी जीजीभॉय !!

मुंबईत भेट द्यायलाच हवी अशी १० ठिकाणं...तुम्ही किती पाहिलीत ?

राजेरजवाडे मुंबईत कुठे राहायचे माहित आहे का ? जाणून घ्या मुंबईतल्या ऐतिहासिक महालांबद्दल !!

या ११ ठिकाणी मिळतो मुंबईतील बेस्ट वडापाव !!

भाऊ, मुंबई किनाऱ्यावर पकडलेल्या एका माशानं या भावांचं नशीब पालटलं...

ताज महाल हॉटेलच्या जन्माचा हा किस्सा प्रत्येक भारतीयाने वाचलाच पाहिजे !!

शहर माणसांचं की प्लास्टिकचं ?...हे फोटो प्रत्येक मुंबईकराने बघितलेच पाहिजेत !!

सबस्क्राईब करा

* indicates required