ताज महाल हॉटेलच्या जन्माचा हा किस्सा प्रत्येक भारतीयाने वाचलाच पाहिजे !!

मंडळी, मागील १०० पेक्षा जास्त वर्षांपासून ताज महाल हॉटेल मुंबईची शान बनून दिमाखात उभं आहे. गेल्याच वर्षी ताज महाल हॉटेल या वास्तूचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन (जिओग्राफिक मार्किंग) झालं. ही इमारत तिच्या अनोख्या बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. मंडळी आज आम्ही ताज हॉटेल बद्दल एक गमतीदार किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा घडला नसता तर कदाचित आज ताज हॉटेल अस्तित्वात नसतं.

राव, गोष्ट इंग्रजांच्या काळातली आहे जेव्हा पुणेरी पाट्या नसून इंग्रजी पाट्या असायच्या. ज्यावर लिहिलेलं असायचं ‘Dogs And Indians Not Allowed’. म्हणजे कुत्रे आणि भारतीयांनी प्रेवेश करू नये. अशीच एक पाटी मुंबईतल्या त्याकाळातील प्रतिष्ठित ‘वॉट्सन हॉटेल’ बाहेर लावली होती. या हॉटेल मध्ये फक्त गोऱ्यांना प्रवेश होता.

स्रोत

टाटा उद्योगाचे संस्थापक जमशेदजी टाटा एके दिवशी या हॉटेल मध्ये गेले असता तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आत प्रवेश दिला नाही. या घटनेमुळे त्यांनी स्वतः एक हॉटेल बांधण्याचं ठरवलं. हे हॉटेल म्हणजेच ताज महाल हॉटेल.

मंडळी, हा किस्सा घडलाच नव्हता असंही काही इतिहासकारांच्या मत आहे. असाही एक किस्सा सांगितला जातो की, जमशेदजी टाटा यांनी हे हॉटेल मुंबईच्या लोकांना शाही थाट अनुभवता यावा म्हणून तयार केलं होतं.

स्रोत

मंडळी किस्सा काहीही असला तरी जमशेदजी टाटा यांनी उभारलेली ही इमारत आज मुंबईची ओळख बनली आहे. २६/११ च्या हल्ल्याने सुद्धा ताज महाल हॉटेलच्या रुबाबात किंचितही फरक पडलेला नाही.

 

वॉट्सन हॉटेल बद्दल थोडक्यात

वॉट्सन हॉटेल हॉटेल आजही मुंबईच्या काळा-घोडा भागात आहे. हे हॉटेल १८६० ते १८६३ च्या काळात बांधण्यात आलं. म्हणजे तब्बल १५० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी. वॉट्सन हॉटेलची खासियत म्हणजे त्याची इमारत ‘कास्ट आयर्न’च्या आधारावर उभी आहे. कास्ट आयर्नवर उभी असलेली ही भारतातील सर्वात जुनी इमारत म्हणून ओळखली जाते. हे हॉटेल बऱ्याच अर्थाने ऐतिहासिक आहे. लेखक मार्क ट्वेन तसेच मोहम्मद आली जिना या हॉटेलला भेट देऊन गेले होते. आज या इमारतीला Esplanade Mansion म्हटलं जातं.

वॉट्सन हॉटेल मध्ये पहिल्यांदा चलतचित्रपट दाखवण्यात आला होता. चित्रपट क्षेत्राला सुरुवात करणाऱ्या पहिल्या काही फिल्म निर्मात्यांमधले चित्रपटकार ऑगस्ट आणि लुई ल्यूमेर या बंधूंचा हा सिनेमा होता.

 

आणखी वाचा :

ताज हॉटेलचा फोटो वापरल्यास तुम्हांला शिक्षा होऊ शकते बरं...वाचा यामागचं कारण !!!

सबस्क्राईब करा

* indicates required