ताज हॉटेलचा फोटो वापरल्यास तुम्हांला शिक्षा होऊ शकते बरं...वाचा यामागचं कारण !!!

गेटवे ऑफ इंडिया जशी मुंबईची ओळख आहे तशीच मुंबईची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे “ताज महाल हॉटेल पॅलेस”. २६/११ च्या हल्ल्यानंतर तर आख्ख्या जगाचं लक्ष ताज हॉटेलवर वेधलं गेलं आहे. मंडळी ही हेरीटेज इमारत बांधून ११४ वर्ष पूर्ण झाली आणि आज ११४ वर्षानंतर ताज हॉटेलला त्याची एक अनोखी ओळख मिळाली आहे. ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या माना गर्वाने उंचावणार आहेत.

Image result for trademark registrationस्रोत

सहसा एखादा लोगो, विशिष्ट रंगसंगती, ब्रँडचं नाव हे ट्रेडमार्क केलं जातं. पण आज भारतात पहिल्यांदाच एखाद्या वास्तूचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे. ती वास्तू म्हणजे आपलं ताज महाल हॉटेल. ताज हॉटेलची बनावट आणि त्यात केलेल्या इंडोसारसेनिक पद्धतीचा वापर तिला वेगळी ओळख निर्माण करून देते. तिचे वास्तुरचनेच्या दृष्टीने असलेले महत्व बघता ट्रेडमार्क नोंदणी केली असल्याचं ताज महाल पॅलेस चालवणाऱ्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे जनरल काऊन्सेलर राजेंद्र मिश्रा यांनी म्हटलंय.

 

ट्रेडमार्कचा उपयोग काय ?

ट्रेडमार्क नोंदणी झाल्यामुळे कोणालाही ताज महाल हॉटेलचा फोटो व्यावसायिक (Commercial) कारणासाठी वापरता येणार नाही. फोटोचा वापर करण्यासाठी तुम्हाला अधिकृतरीत्या परवानगी घ्यावी लागेल. आणि परवानगी शिवाय वापर केल्यास कंपनी तुम्हाला कोर्टात खेचू शकते.

अश्या प्रकारचा ट्रेडमार्क जगभरातल्या काही विशिष्ट इमारती, वास्तूंना मिळाला आहे.   न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचं आयफेल टॉवर, सिडनीचं ऑपेरा हाऊस अशी काही प्रसिद्ध नावे उदाहरण म्हणून देता येतील. आता यांच्या पंगतीत आपलं ताज हॉटेलही सामील झालं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required