computer

या बर्गरचे किस्से वाचून तिखट खाणं विसराल भौ !!

मंडळी, तुम्ही तिखट खाण्याचे शौकीन आहात का? कितीही तिखट तुम्हाला झेपतं का? उत्तर हो असेल तर पुन्हा एकदा विचार करा. कारण ऑस्ट्रेलियातला एक बर्गर सध्या तिखट खाणाऱ्यांची पुंगी वाजवतोय. तुम्हाला जर वाटत असेल की, तिखट म्हणजे किती तिखट असेल राव? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा बर्गर एवढा तिखट आहे, की बर्गर खाऊन काहीही झालं तर ती जबाबदारी रेस्टॉरंटची नसेल असं त्यांनी ग्राहकांकडून लिहून घेतलं. हे एवढं रिस्की आहे भौ !!

राव, चला या बर्गरबद्दल आणखी जाणून घेऊया !!

१. या बर्गरचं नाव ‘The Double Decker Death Wish’ असून हा ऑस्ट्रेलियातला सर्वात तिखट बर्गर म्हणून प्रसिद्ध आहे.

२. डबल डेकर यासाठी की या बर्गर मध्ये २ ‘टिक्की’ मिळतात. या दोन टिक्की म्हणजे चक्क दोन अणुबॉम्ब आहेत राव!!

३. राव, तुम्हाला धक्का बसेल पण बर्गर खाताना ग्राहकांना स्पेशल चष्मा व हातमोजे घालावे लागतात.

४. ग्राहकांची ही गत, तर त्या लोकांचं काय जे बर्गर बनवतात ? राव, हा बर्गर बनवताना रेस्टॉरंटच्या शेफ्सना खास कपडे घालावे लागतात. हे एक प्रकारे सुरक्षाकवच म्हणून काम करतं.

५. आता तुम्हाला सांगतो, या बर्गरला एवढं तिखट बनवणारा फॉर्म्युला कोणता आहे ते...

हे रहस्य दडलंय एका सॉसमध्ये. या सॉसचं नाव आहे ‘घोस्ट पेपर सॉस’. कॅरोलिना रेपर, त्रिनिदाद स्कॉर्पियन, पिकल्ड हालापेन्स, हाबानेरो आणि भारतातल्या भूत झालोका या ५ वेगवेगळ्या मिरच्यांच्या वापरातून हा सॉस तयार केला जातो. या मिरच्या जगात अत्यंत तिखट मिरच्या म्हणून प्रसिद्ध आहेत. 
 
राव, विचार करा आणि जर ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळालीच तर हा बर्गर चाखायला विसरू नका. पण....जर काही झालं तर आम्हाला दोष द्यायचा नाही भौ.

सबस्क्राईब करा

* indicates required