'आयआयटी मंडी'च्या ११ विद्यार्थ्यांनी पटकावली गूगलची शिष्यवृत्ती !!

गूगलच्या Google Summer of Code (GSOC) या कार्यक्रमात मंडी आयआयटीच्या अकरा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावली आहे. २४०० डॉलरची ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी जगातील १०८ देशातल्या १३००० विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला होता. पण मंडीचे वैशिष्ट्य असे की एकाच संस्थेतील ११ जणांनी हे यश मिळवल्यावर जगातल्या पहिल्या दहा संस्थांमध्ये त्याचे नाव विराजमान झाले आहे. ओपन सोर्स म्हणजे सर्वांसाठी मुक्त अशी संगणक प्रणाली बनवणार्‍या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्यांनी ही स्पर्धा परीक्षा २००५ साली सुरु केली होती. आता हे विद्यार्थी या कंपन्यांतील मेंटॉर सोबत (म्हणजे गुरु सोबत) तीन महिने काम करतील. या अगोदर मंडी आयआयटीच्या २ विद्यार्थ्यांनी २०१६ साली आणि ४ विद्यार्थ्यांनी २०१७ साली ही शिष्यवृत्ती पटकावली होती.

यावरून काही गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात त्या अशा की :

१. आपल्या देशात हुषार विद्यार्थ्यांची कमी नाही.

२. २०११ साली सरकारने नविन आठ आयआयटी सुरु करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याचे हे यश आहे.

३. जर असेच यश मिळवले तर संगणक क्षेत्रात भारतीय तरुणांचा वरचष्मा राहील.

सबस्क्राईब करा

* indicates required