computer

वायफाय, वॉश बेसिन, चार्जिंग पॉईंट, सॅनिटायझर आणखी काय काय आहे या रिक्षात ?

आनंद महिंद्रांच्या ट्विटर फॉलोअर्सना माहित आहे की देशातल्या कानाकोपऱ्यातल्या भन्नाट कामं करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ किंवा त्यांची माहिती ते आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नेहमी शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांनी एखादी गोष्ट आवडली म्हणजे निश्चितच त्यात काहीतरी दम असतो.

आता असाच एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका रिक्षेचा आहे. या रिक्षात वायफाय, वॉश बेसिन, चार्जिंग पॉईंट, सॅनिटायझर एवढेच नाहीतर ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळी डस्टबिन्स ठेवली आहेत. आता जर एक साधासुधा रिक्षावाला एवढी काळजी घेतोय तर त्याबद्दल कौतुक कुणाला नाही वाटणार? आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की कोरोना स्वच्छ भारत मिशनला हातभार लावत आहे.

त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला एक बोर्ड लावला आहे. त्यावर लिहिलं आहे, "ही रिक्षा भारतातील पहिली होम सिस्टीम ऑटोरिक्षा आहे." या बोर्डावर असंही म्हटलं आहे की नवीन लग्न झालेले जोडपे या रिक्षातून मोफत प्रवास करू शकतात. सोबत कोरोना हेल्पलाईननंबर सुद्धा देण्यात आला आहे.

हा व्हिडीओ चांगलाच वायरल होत असून त्या रिक्षावाल्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required