computer

व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क टॅक्सी चालक अस्खलित संस्कृत बोलतोय राव...

देशातलीच नाही तर जगातली सर्वात जुन्या भाषेपैकी एक भाषा म्हणून संस्कृत ओळखली जाते. ३५००वर्षांपासूनची मोठी परंपरा तिला लाभली आहे. स्कोरिंग विषय म्हणून तुम्हीही आठवी ते दहावी  तुम्ही संस्कृत शिकले असेलच म्हणा. पण देव, माला आणि राम सोडले तर  कुणालाच शाळेत शिकलेले जास्त काही आठवण्याची शक्यता कमीच आहे. हिंदी, इंग्रजी आपल्या बोलीभाषेचा भाग बनल्या, पण कुणी येताजाता संस्कृत काही झाडात नाही. 

 पण आता एका टॅक्सी ड्रायव्हमुळे पुन्हा एकदा संस्कृत चर्चेत आली आहे. मंडळी, हा भाऊ एखादया पंडितासारखी संस्कृत बोलतो.  हा भाऊ प्रत्येक शब्द अस्खलित बोलतो. या टॅक्सी ड्रायव्हरच्या संस्कृत बोलण्याने सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

४५ सेकंदाच्या या क्लिपमध्ये हा बंगळुरूचा टॅक्सी ड्रायवर त्याच्या गाडीत बसलेल्या प्रवाशासोबत संस्कृतमध्ये गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. हा विडिओ ट्विटरवर गिरीश भारद्वाज नावाच्या एका यूजरने टाकला आहे. 

या विडिओत प्रवासी आणि त्या टॅक्सी ड्रायव्हर दरम्यान संवाद पाहायला मिळत आहे. प्रवासी ड्रायव्हरला विचारतो 'तुझे नाव काय आहे' 
तो ड्रायव्हर त्याचे नाव सांगतो पण विडिओत व्यवस्थित ऐकू येत नाही. नंतर तो प्रवासी त्याला विचारतो 'तुम्हाला संस्कृत केव्हापासुन येते?' त्याला उत्तर देताना ड्रायव्हर सांगतो कि त्याने संस्कृत राजा राजस्व शहर यांच्या ध्यान शिबिरात जेव्हा तो तरुण होता तेव्हा शिकली आहे. 

नंतर तो प्रवासी त्याला विचारतो कि 'तु संस्कृतमध्येच बोलतोस की दुसऱ्या भाषेत पण बोलतो?' आणि तो ड्रायव्हर सांगतो कि गेल्या दहा वर्षापासुन तो फक्त संस्कृत बोलत आहे. पुढचा प्रश्न तो प्रवासी जो विचारतो तो प्रश्न तुमच्या सुद्धा मनात आला असेल राव!!  "संस्कृत शिकणे सोपे आहे का?" तेव्हा तो उत्तरतो कि 'मला संस्कृत खुप सोपी वाटते!!

शेवटी तो प्रवासी विचारतो कि 'तु आजवर किती पुस्तके वाचली आहेत?' तेव्हा त्याला उत्तर देताना तो सांगतो कि 'मी मोजकीच पुस्तके वाचली आहेत' त्यात उपनिषद, गीता आणि धर्म ग्रंथ यांच्यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे. 

मंडळी या भाऊने मात्र पूर्ण इंटरनेटवर हवा करायला सुरवात केलेली आहे. जिकडे तिकडे त्याचीच चर्चा आहे. या विडिओला तब्बल २९११ रिट्वीट आणि ७१.१ हजार व्ह्यूज आलेले आहेत. 

सध्या भारतात संस्कृतचा वापर कमी झाला असला तरी कर्नाटकातल्या एका खेड्यात सर्वजण आजही संस्कृतमध्ये बोलतात. अजुनही सुधर्मा सारखे काही पेपर संस्कृतमध्ये प्रकाशित होत आहेत. हो पण त्याचा खप दिवसेंदिवस कमी होत आहे. पंडित वरदराज अयंगार यांच्यासारखी मंडळी संस्कृत वाढावी यासाठी मेहनत घेत आहेत. ते गेल्या 50 वर्षापासुन संस्कृत वर्तमानपत्र चालवत आहेत.  अशा काही लोकांमुळे आजही संस्कृत जिवंत आहे.


मग काय मंडळी, आठवी ते दहावी काय शिकला होतात ते आठवा आणि संस्कृतमध्ये तुम्हांला किती काय बोलता येते याची चाचणी घ्या. 

आम्ही आमच्यापासूनच सुरुवात करतो. अहम बोभाटास्मि|

सबस्क्राईब करा

* indicates required