computer

बाजारातले थोरले बाजीराव ! बोभाटाच्या या नव्या मालिकेत काय वाचाल ?

आता आणखी काही सांगण्यापूर्वी एक महत्वाची सूचना ! इथे बाजार हा शब्द शेअरबाजार या अर्थाने वापरला आहे.थोरले बाजीराव हा शब्दप्रयोग शेअरबाजारातील मोठे गुंतवणूकदार या अर्थाने वाचावा.थोरले बाजीरावचे सोप्पे रोजच्या बातम्यांमध्ये झळकणारे उदाहरण म्हणजे राकेश झुनझुनवाला ! पण मंडळी हा  शेअरबाजार आहे , या बाजारात राकेश झुनझुनवाला हे एकटेच बाजीराव नाहीत. त्यांच्यापेक्षाही मोठे खिलाडी या बाजारात आहेत पण तुम्हाआम्हाला त्यांची ओळख नाही. म्हणून या लेखमालिकेत शक्यतो  प्रसिध्दीच्या झोतात नसलेल्या थोरल्या बाजीरावांची ओळख आम्ही करून देणार आहोत.

 

पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की वाचकाने त्यांची कौतुकं का वाचावीत ? तर मंडळी या मालिकेतील लेख 'कौतुक' या सदरात मोडणारे नसतील. एकेकाळी छोटे असलेले हे गुंतवणूकादार मोठे कसे झाले ? त्यांची विचार करण्याची पध्दत काय आहे ? ते बाजाराकडे आणि आर्थिक विश्वाकडे कसे बघतात ? ते कोणत्या कंपनीचे समभाग घेतात ? का घेतात ? सध्या त्यांची गुंतवणूक आणि निर्गूंतवणूक काय आहे ? आणि सगळ्यात महत्वाचे असे की  बाजाराशिवाय ते इतर काही म्हणजे सामाजिक जबाबदार्‍यांना महत्व देतात का ? अशा प्रश्नांची उत्तरे शोधून काढणार आहोत.

त्यांनी घेतलेले समभाग वाचकांनी घ्यावे अथवा नाही  याबद्दल मात्र आम्ही आमचे मत मांडणार नाही.तो प्रत्येकाचा वैयक्तिक कौल असेल. आम्ही कधीही त्यात ढवळाढवळ करणार नाही !

या मालिकेतील पहिला लेख लवकरच येतो आहे तो वाचून तुमचे मत जरूर नोंदवा !

सबस्क्राईब करा

* indicates required