computer

लाखो रुपये लुटून जाता जाता चोरांनी आरशावर काय लिहिलंय पाहा....

हा फोटो बिहारची राजधानी पटना येथील हनुमान नगरच्या एका घरातला आहे. या घरात स्थानिक व्यावसायिक प्रवीण त्याच्या पत्नी सोबत राहतो. त्याच्या घरातल्या आरशावर लिहीलंय “भाभीजी बहुत अच्छी हैं।” आणि खाली भाभीच्या नवऱ्याबद्दल म्हणजे प्रवीणबद्दल शिव्यांची लाखोली वाहिली आहे. या फोटो मागची गोष्ट आज जाणून घेऊया.

हे काम बिहारच्या चोरांनी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी या घरात चोर घुसले आणि त्यांनी घरातून ६० लाख रुपयांचे दागिने चोरले. शिवाय ३५ लाख रुपये रोकड पण त्यांनी लंपास केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी किचनमधून तेल, पीठ, तांदूळ, मॅगीचे पॅकेट्स, टूथपेस्ट आणि सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर एवढं सगळं चोरून नेलं.

एवढी मोठी चोरी होऊनही सध्या चर्चा मात्र आरशावर लिहिलेल्या मजकुराची आहे. हा मजकूर चोरांनी जाता जाता लिहिला आहे. चोरीच्यावेळी असं काय घडलं की चोरांनी आरशावर फीडबॅक लिहिला याबद्दल समजू शकलेलं नाही.

आता जे लिहिलंय त्याबद्दल आपल्याला गम्मत वाटू शकते पण पोलिसांसाठी हा चोरांना पकडण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. हस्ताक्षरावरून चोराला नक्कीच पकडता येऊ शकतं. बिहारचे पोलीस या दिशेने तपास करतील असं सध्या तरी आपण गृहीत धरू शकतो. अशा पद्धतीने चोर पकडले गेले तर चोरांनी जाता जाता स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे असं म्हणता येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required