पेले, मॅराडोना आणि प्लॅटिनी...या फोटोमागे काय गोष्ट आहे?

१९८६ सालच्या या फोटोत तीन फुटबॉलचे हिरो आहेत.मध्यभागी उभा आहे पेले. त्याच्या उजव्या बाजूस आहे दिएगो मॅराडोना आणि डाव्या बाजूस आहे प्लॅटिनी ! तिघेही फुटबॉलच्या विश्वातील देव समजले जातात.

ही मॅच अंमली पदार्थ सेवनाच्या विरोधात आयोजित केली होती म्हणून मॅराडोनाच्या  जर्सीवर 'No Drugs' असं लिहिलंय. प्लॅटिनीच्या जर्सीवर 'No Corruption' असे सामाजिक संदेश लिहिलेले दिसत आहेत.

विरोधाभासाचा इतिहास असा की १९९५ साली मॅराडोना अंमली पदार्थाच्या सेवनामुळे १५ महिने तुरुंगात गेला होता. No Corruption म्हणणारा प्लॅटिनी २०१५ साली भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जन्मभर फुटबॉलच्या खेळातून बाहेर केला गेला.

पेले जसा होता तसाच आजही आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required