computer

व्हिडीओ ऑफ दि डे : जेव्हा जगातल्या दोन अतिश्रीमंत व्यक्ती वेटर म्हणून काम करतात !!!

मंडळी, तुम्ही एका हॉटेलमध्ये जाता आणि तुमची ऑर्डर घेण्यासाठी तुमच्याकडे एक वेटर येतो. तुम्ही त्याचा चेहरा नीट बघता तेव्हा तुम्हाला कळतं की तो दुसरा तिसरा कोणी नसून जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. तुमची प्रतिक्रिया काय असेल?

ही फक्त कल्पना नाही मंडळी.. वॉरन बफे आणि बिल गेट्स हे दोन करोडोंपती उद्योगपती एका आईसक्रिम शॉपमध्ये वेटर म्हणून काम करायला गेले होते. त्यावेळी काय घडलं हे या व्हिडीओमध्ये पाहा.

मंडळी, अति श्रीमंत व्यक्तींची ही एक खास सवय आहे. एखादा दिवस निवडून ते सामान्य माणसाचं आयुष्य जगतात. असं केल्याने त्यांना सामान्य लोकांचं जीवन जवळून बघता येतं.

वॉरन बफे आणि बिल गेट्स हे दोघेही असेच अमेरिकेतल्या ओमाहा शहरातल्या डेअरी क्वीन शॉपमध्ये नोकरीला गेले होते. या शॉपपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपल्या महागड्या गाड्या वापरल्या नाहीत. त्यांनी सामान्य लोकांकडून मदत मागितली.

डेअरी क्वीनमध्ये पोहोचल्यावर त्यांनी स्टाफचे कपडे घातले, आपल्या नावाचा टॅग लावला. बघणाऱ्याला ही गंमत वाटेल पण दोघांनी तिथल्या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक आत्मसात करून घेतल्या. बिल गेट्स तात्याने कॅशियर म्हणून काम केलं तर वॉरन बफे आजोबांनी डेअरी क्वीनची ओळख असलेली “बिझार्ड” डिश लोकांना सर्व्ह करायचं काम केलं.

मंडळी, शेवटी जेव्हा डेअरी क्वीनच्या एका कर्मचाऱ्याला दोघांच्या कामाविषयी विचारलं तेव्हा त्याने उत्तर दिलं की “त्यांना आणखी चांगलं काम करता आलं असतं”..... बघा राव, जगातले अति श्रीमंत व्यक्ती पण परफेक्ट नाहीत.

तर मंडळी, बिल गेट्स आणि वॉरन बफे यांच्याकडे भरपूर पैसा असला तरी त्यांचे पाय अजूनही जमिनीला टेकलेले आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होतं.