कोंबडीला सायकलीने उडवल्यानंतर त्याने जे केलं ते बघून तुम्ही त्याचं कौतुक कराल !!

लहान मुलांचं मन साफ असतं असं म्हणतात. त्यांच्या वागण्यात मोठ्यांचा खोटेपणा नसतो. नुकताच घडलेला हा किस्सा वाचून तुमचा या गोष्टीवर नक्की विश्वास बसेल.
मिझोरमच्या एका मुलाने चुकून त्याच्या सायकालीने एका कोंबडीला जखमी केलं. त्याचं त्याला एवढं वाईट वाटलं की तो कोंबडीला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेला. उपचारासाठी त्याने आपले जमवलेले सगळे पैसे सोबत घेतले होते.
Sanga Says या फेसबुक युझरने या मुलाचा फोटो आणि फोटो मागील गोष्ट सांगितली आहे. त्यानंतर ती पोस्ट व्हायरल झाली. लोकांनी मुलाच्या निरागसतेचं कौतुक केलं आहे. या मोजक्या प्रतिक्रिया पाहून घ्या !!
मंडळी, या पोस्टला तब्बल ८६,००० पेक्षा जास्त शेअर्स मिळाले आहेत. जवळजवळ ११,००० प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. लाईकचं म्हणाल तर तो आकडा लाखांच्या घरात आहे.
मंडळी, या मुलाच्या जागी जर कोणी मोठा असता तर त्याने नक्कीच त्या कोंबडीला रस्त्यावर मरण्यासाठी सोडलं असतं किंवा मग कोंबडीला घरी नेऊन तिचा फडशा पाडला असता. पण या लहान मुलाने मोठ्यांना पण नवीन धडा शिकवला आहे.
तुम्हाला काय वाटतं या लहानग्याबद्दल ?? आम्हाला नक्की सांगा !!