computer

बोभाटा बाजार गप्पा : मान्सूनमुळे शेअर बाजार शंकेच्या फेऱ्यात !!

१. बाजाराला अवर्षणाची भीती

काल आपण स्कायमेटच्या मान्सून अंदाजाच्या मुद्द्याचा उल्लेख केला होता. त्याप्रमाणे दुपारी जेव्हा स्कायमेटने यावर्षीचा मान्सून सरासरीच्या फक्त ९३% असेल असा अंदाज वर्तवला तेव्हा बाजारात विक्रीची सुरुवात झाली होती. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही “मार्केट इंडिकेटर्स” घसरले.

२. काल आपण एफआयआय आणि डीआयआय यांच्या खरेदी विक्रीबद्दल चर्चा केली होती. बऱ्याच कालावधीनंतर एफआयआयने काल 10 अब्ज रुपयांपेक्षा जास्त विक्री केली. एफआयआय काल “नेट सेलर्स” (म्हणजे खरेदीपेक्षा विक्री जास्त) होते. भारतीय शेअर बाजारावर एफआयआयच्या खरेदी विक्रीचा मोठा परिणाम दिसतो त्याचे कारण असे की डीआयआयपेक्षा जास्त भांडवल गुंतवतात.

३. ब्रेंट क्रूडचे चढते भाव म्हणजे पेट्रोलचे भाव वाढणार हे निश्चित आहे. साहजिकच ऑटो कंपन्यांच्या शेअर वरती याचा परिणाम दिसून येईल. हा परिणाम दिसायला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे याचे कारण असे की सध्या डॉलर रुपयाच्या तुलनेत पडतो आहे. गेल्या ३ दिवसात डॉलर ९३ पैशांनी घसरला आहे. जर ब्रेंट क्रूडचा भाव वाढत राहिला तर डॉलर महाग होण्याची शक्यता आहे.

४. आरबीआय क्रेडिट धोरण दुपारी १२ पर्यंत जाहीर होईल. व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी होईल असा सर्वसाधारण अंदाज आहे. तो बाजाराने आधीच गृहीत धरलेला आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की येत्या काही दिवसात आर्थिक तरलता (लिक्विडीटी) उपलब्ध करण्यासाठी रिझर्व बँक काय पाऊल उचलते याकडे शेअर बाजाराचे लक्ष असेल.

५. कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम कर्ज वसुलीवर होईल हे नक्की आहे. रिझर्व बँक हा खटला हरल्यामुळे बँकांची कर्ज वसूली अडचणीत येऊ शकते. एनबीएफसी आणि बँकांच्या शेअरवर याचा परिणाम आज दिसेल.

कोणत्या क्षेत्रावर नजर ठेवाल ?

बँकिंग, वाहन, एनबीएफसी, धातू. एअरलाइन्स आणि ऑइल मार्केटिंग स्टॉकसाठी नकारात्मक.

 

ब्रोकर्स काय करतायत ?

मॉर्गन स्टॅनली 28992 पासून आयशर मोटर्सचे टार्गेट 21331 वर कमी केले. गोल्डमॅन सॅक्स टीव्हीएस मोटर टार्गेट 728, जेपी मॉर्गन कॉन्कॉर टार्गेट 590, मॅक्वायअर एयू स्मॉल फायनान्स टार्गेट 590.

सबस्क्राईब करा

* indicates required