computer

गंगाघाटावरून १०० वर्षापूर्वी चोरण्यात आलेली मूर्ती भारतात परतणार...कुठे होती ही मूर्ती?

काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधून भारतात श्रीराम, सितामाता आणि लक्ष्मण यांच्या ५०० वर्ष जुन्या मुर्त्या परत आल्या होत्या. आता पुन्हा एकदा कॅनडा भारतातून १०० वर्षांआधी चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती परत करणार आहे.

कॅनडा येथील रेजिना विद्यापीठ येथे ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. हे विद्यापीठ आपल्या ऐतिहासिक चुका सुधारण्याचा सध्या प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून ही मूर्ती परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मूर्ती कॅनडाचे पत्रकार आणि इतिहासकार नोर्मान मॅकेंजी यांच्या १९३६ सालच्या मृत्युपत्राचा भाग आहे. विद्यापीठानुसार भारतीय कलाकार दिव्या मेहरा यांनी या मूर्तीबद्दल विद्यापीठाच्या लक्षात आणून दिले. त्यांनी सांगितले की शतकभरापूर्वी ही मूर्ती बेकायदेशीरपणे कॅनेडात आली होती.

आता थोडं या मूर्तीबद्दल

हि मूर्ती १८ व्या शतकातील अन्नपूर्णा मातेची आहे. १९१३साली मॅकेंजी भारत दौऱ्यावर असताना त्यांनी ही मूर्ती बघितली. आपल्याला ही मूर्ती हवी अशी इच्छा व्यक्त केल्यावर त्यांना एका चोराने ही मूर्ती गंगा घाटावरून चोरी करून आणून दिली होती.

१९ नोव्हेंबर रोजी रेजिना विद्यापीठातील डिजिटल कार्यक्रमात ही मूर्ती भारतीय उच्चायुक्त अजय बीसरिया यांना सोपविण्यासाठी चर्चा झाली. लवकरच ही मूर्ती भारतात परतेल हे निश्चित. हे झालं एका मूर्तीबद्दल जगभरात भारतातल्या अशा कितीतरी मुर्त्या विखुरलेल्या आहेत. त्याही पुढील काळात भारतात परततील अशी आपण आशा करू.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required