computer

गाडी चोर गाडीतच अडकला...वाचा पुढे काय झाले !!

नॉर्वेच्या ट्रोनहाइम शहरातील पोलिसांना ख्रिसमसच्या मुहूर्तावर त्यांच्या एका जुन्या मित्राचा फोन आला. हा मित्र म्हणजे १७ वर्षांचा चोर होता. झालं काय, की तो कार चोरी करण्यासाठी एका कार मध्ये बसला आणि तेवढ्यात दारं लॉक झाली. मग काय, बेटा अडकला ना आत.  

काही केल्या दार उघडत नाही बघून त्याला घाम फुटला, मग त्याने शेवटचा पर्याय म्हणून चक्क पोलिसांनाच मदत मागितली. आता शेवटी पोलीस हे त्याचे जुने मित्रच की !!

पोलिसांनी तत्काळ जागेवर पोहोचून मुलाला बाहेर काढलं. पोलीस म्हणतात की त्यावेळी तो भेदरलेला होता. कार उघडताना कारचं नुकसान झालं नव्हतं. त्याला त्याच्या कृत्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की ‘मला फक्त कार मधून फिरून यायचं होतं !!’ हे उत्तर ऐकून अर्थातच पोलीस त्याला सोडलं नाही.

मंडळी, १७ वर्षांचा हा चोर ट्रोनहाइम भागातल्या पोलिसांचा आता चांगलाच परिचयाचा झाला आहे. त्याने फार पूर्वीच पोलिसांच्या रेकॉर्ड मध्ये आपलं खातं उघडलंय. त्याने पूर्वी पण कार चोरी केली होती आणि तो यशस्वी झाला होता. पण काहीही झालं तरी तो ‘नवखा चोर’ आहे. त्यामुळे तो यावेळी अडकला. याच श्रेय वोल्वो कारला जातं. वोल्वो मध्ये असलेल्या एका विशिष्ट सेन्ट्रल लॉकिंग सिस्टीममुळे तो आत अडकला होता.

तर मंडळी, ही म्हणजे करायला गेलो एक आणि झालं एक अशी गत झाली.

सबस्क्राईब करा

* indicates required