व्हायरल व्हिडिओ: पुरात बेशुद्ध पडलेल्या मनुष्याला या महिला पोलिसाने कसं वाचवलं?

तमिळनाडू राज्य सध्या पुराने त्रस्त आहे. त्यातही या राज्याची राजधानी चेन्नई यात अधिकच नुकसान सहन करत आहे. पूर आला म्हणजे लोकांची प्रचंड वाताहत होते. अशावेळी सुरक्षा यंत्रणा आपापल्या परीने हे संकट निस्तारण्यासाठी मदत करतात.

चेन्नईतला पूर मात्र खूपच घातक आहे. लोकांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. या सर्व परिस्थितीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडत केलेली कामगिरी मात्र फारच कौतुकास्पद आहे.

राजेश्वरी असे या पोलीस कर्मचारी महिलेचे नाव आहे. त्यांचा व्हिडिओ वायरल होत असून यात व्हिडीओत त्यांनी केलेले काम हे त्यांच्याप्रती मोठा आदर निर्माण करणारे आहे. रेस्क्यू कार्यात लागलेले पोलीस दल झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामात लागले असताना राजेश्वरी त्या फांद्या रस्त्यातून उचलून दूर करतात. अशात एक माणूस बेशुद्ध अवस्थेत पडला असताना राजेश्वरी त्याला स्वतःच्या खांद्यावर धरून ऑटोपर्यन्त घेऊन गेल्या. त्याला ऑटोच्या मागच्या सीटवर ठेवून ती ऑटो गेल्यावर पुन्हा आपल्या कामाला परतत असताना त्या दिसतात. बेशुद्ध माणसाला आधी त्यांनी प्रथमोपचार दिला होता

 

#WATCH | Chennai, Tamil Nadu: TP Chatram Police Station's Inspector Rajeshwari carries an unconscious man, on her shoulders, to an autorickshaw in a bid to rush him to a nearby hospital.

Chennai is facing waterlogging due to incessant rainfall here.

(Video Source: Police staff) pic.twitter.com/zrMInTqH9f

— ANI (@ANI) November 11, 2021

ऑटो हॉस्पिटलला गेल्यावर तिथंही त्या गेल्या. तिथे बेशुद्ध व्यक्तीची आई उपस्थित होती. डॉक्टरांना भेटून मगच त्या आपल्या कामाला परत गेल्या होत्या. त्यांच्या या कामाचे चहुबाजूंनी कौतुक होत आहे. चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जीवाल यांनी सुद्धा राजेश्वरी यांची पाठ थोपटली आहे.

राजेश्वरी यांच्या या कामाने लोकांचा पोलीस दलाबद्दल असलेला विश्वास मजबूत होण्यास मदत होणार आहे.

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required