f
computer

तुम्हीही अनुभवू शकता तो थरार : टायटॅनिक परत येतंय..

"कधीही न बुडणारं जहाज" असा नावलौकिक घेऊन हे जगातलं सर्वात मोठं जहाज इंग्लंड मधून न्यूयॉर्कच्या दिशेनं निघालं आणि अवघ्या चार दिवसांत या टायटॅनिकला जलसमाधी मिळाली. जवळपास १,५१७ प्रवाशांचा मृत्यू या अपघातात झाला. हे सगळं तुम्ही टायटॅनिक या चित्रपटात पाहीलं असेलच. पण या जहाजाबद्दल थोडी जास्त उत्सुकता असणार्‍यांसाठी हे जहाज परत येत आहे... 

         चीनमधली जिनलिंग शिपयार्ड ही जहाज निर्माती कंपनी टायटॅनिकची प्रतिकृती निर्माण करतेय. यासाठी क्लाईव्ह पाल्मर या अॉस्ट्रेलीयन अब्जाधीशानं गुंतवणूक केली आहे.  ही टायटॅनिकची जशीच्या तशी प्रतिकृती बनवण्यासाठी १.६५ करोड डॉलर्स इतका खर्च आलाय आणि लवकरच ही प्रतिकृती पूर्णत्वास येईल. 

       

विशेष म्हणजे हे जहाजही त्याच मार्गाने प्रवास करेल ज्या मार्गाने टायटॅनिक प्रवास करणार होतं. यामध्ये विशेष अशा लाईट आणि साऊंड इफेक्ट्सची योजना केली गेलीय ज्यामुळे प्रवाशांना पाण्यात बुडण्याचा थरार अनुभवता येईल !! ८४० खोल्या, ९०० कर्मचारी आणि २४०० प्रवासी क्षमता असणार्‍या या प्रतिटायटॅनीक मधून सफर करण्यासाठी जगभरातुन अनेक जणांनी अ‍ॅडव्हान्स नोंदणी केलीय. तुमची इच्छा असेल तर तुम्हीही करू शकता पण तीही एक चायनीज बनावट बोट आहे हे विसरू नका म्हणजे झालं...

सबस्क्राईब करा

* indicates required