आपल्याकडच्या सोन्याचा मान चीनमध्ये चांदीला.. चीनमधल्या या प्रांतात चांदीचा किती हुंडा द्यायला लागतो पाहा

आपल्याकडच्या नायर वधूंना तुम्ही नखशिखांत सोन्यानं मढलेलं पाह्यलं असेलच. अगदी मनगटापासून दंडापर्यंत सोन्याच्या बांगड्या, गळ्यापासून नाभीपर्यंत येणारे सत्राशेसाठ हार आणि भलीमोठी अवजड कर्णभूषणं!!
तुम्हांला माहिती अहे, चीनमधल्या मियाओ प्रांतात पण अशीच एक पद्धत चालू आहे. मात्र इथं सोन्याला नाही, तर चांदीला खूप जास्त महत्व आहे.  भला मोठा चांदीचा दोन अडीच किलोचा मुकुट, खूप सारे हार.. आणि एकेका हाराचं वजन एक ते दीड किलो असतं म्हणे..  हे सगळं  कमी की काय म्हणून त्यांच्या कपड्यावरसुद्धा चांदीचे दागिने लावलेले असतात. 

 



मुलगी लग्नाची होण्याच्या दहा वर्षं आधी पालक या दागिन्यांसाठी पैशांची जमवाजमव करण्याच्या मागे लागतात. साधारण १० ते १५ किलोचा हा सेट तयार करायला खूप पैसे तर लागतातच. आणि अत्यंत बारीक कलाकुसर असलेले हे दागिने बनवायला पुष्कळ वेळही लागतो. 

(कपड्यावरसुद्धा चांदीचे दागिने लावलेले असतात. )

मुलीला किती किलोचे दागिने घातले यावरून त्या घराची श्रीमंती ठरते. यासाठी पूर्ण कुटुंबाला खूप श्रम करून हे पैसे जमवावे लागतात.

पाहा या चांदीच्या दागिन्यांनी मढलेल्या काही सुंदर वधू..

स्रोत 

स्रोत

 

स्रोत

परंपरा भारतीय असो किंवा चीनमधली.. अशाप्रकारे आईबाबांना मुलीच्या लग्नासाठी एवढ्या मोठ्या संकटात टाकणं हे केव्हाही वाईटच. यातून जे मुलीच्या लग्नात घालवलं ते मुलाच्या लग्नात वसूल करण्याची पद्धत तयार होते.. आणि हुंड्याचं दुष्टचक्र चालू होतं.
मंडळी, तुम्हांला आपल्याकडच्या लग्नांत असलेल्या कोणत्या परंपरा आवडतात आणि कोणत्या बंद व्हाव्यात असं वाटतं?

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) ©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required