computer

गाडी १५ हजारची आणि दंड २३ हजार ? नवीन नियमांचा या तरुणाला कसा फटका बसला पाहा !!

सध्या नविन आलेल्या ट्रॅफिक नियमांमुळे सगळीकडे खळबळ उडालेली आहे. दंडाची रक्कम बघितली तर सामान्य माणसाला धडकी भरेल एवढी प्रचंड आहे. समाजमाध्यमात या विषयावर दोन गट पडले आहेत. एक गट म्हणतोय आधी रस्ते सुधारा मग एवढा भरमसाठ दर आकारा, तर दुसरा गट म्हणतो दोन्ही विभाग वेगळे आहेत. दंडाची रक्कम प्रचंड असल्याशिवाय वाहतूक व्यवस्था सुधारणार नाही.

मंडळी, या सर्व गदारोळात वाढलेल्या दंडाच्या रकमेची टिंगल सुरू झाली आहे. अनेकांनी गेल्या 2-3 दिवसात अनेक जोक्स, मिम्स व्हायरल केले. पण आता या  नविन नियमांचा तडाका अनेकांना बसायला सुरुवात झाली आहे. नुकताच गुरगावमध्ये असाच एक भन्नाट किस्सा घडला आहे.

दिल्लीचा दिनेश मदान याला पोलिसांनी तब्बल 23 हजरांचा दंड ठोकला. कारण भाऊने बऱ्याच नियमांचे उल्लंघन केले होते. पण खरे ट्विस्ट असे आहे, की त्याला 23 हजरांचा दंड झाला असला तरी त्याची गाडी फक्त १5 हजार किमतीची आहे म्हणून त्याने त्याची ऍक्टिवा पोलिसांकडे जमा केली. आता पोलिसांची सुद्धा गोची झाली राव!! सध्या प्रकरण कोर्टात गेले आहे.

दिनेशला विना लायसेन्स गाडी चालवण्याचे 5 हजार, विना rc चे 5 हजार, विना इन्शुरन्सचे 2 हजार, प्रदूषण केल्यामुळे 10 हजार तर विना हेल्मेट गाडी चालवल्यामुळे 1 हजार असा एकूण 23 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. 

मंडळी, नविन दंडाची रक्कम वाचली तर अनेक गाडी चालवायचे सोडून देतील एवढी प्रचंड आहे. पूर्वी नियम तोडले की 500- हजार दंड होत होता, आता त्याच नियमांसाठी 5-10 हजार इतका दंड वाढवण्यात आला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर होईल की लोक गाड्या वापरणेच कमी करतील हे येत्या काळात दिसेलच राव!!

सध्या तरी तुम्ही तुमची सगळी कागदपत्रे व्यवस्थित ठेवूनच गाडी घराबाहेर काढणे योग्य राहील...

 

लेखक : वैभव पाटील

 

 

आणखी वाचा :

ट्रॅफिक पोलिसांना चिरीमिरी देण्याआधी या १० महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या !!

नवे मोटार वाहन कायदे वाचले का? आता कायदा मोडणं खिसा किती हलका करेल पाहा..

सबस्क्राईब करा

* indicates required