फेसबुक आता मित्रांना किती लाईक्स आले हे दाखवणं या कारणासाठी बंद करणार!!

फेसबुकवर लाईक मिळवणे नोकरी मिळवण्यापेक्षा महत्वाचे झालेय मंडळी. कुणाच्या फोटोला किती लाईक मिळाले यावरून माणूस किती प्रसिद्ध आहे हे आजकाल ठरवले जातेय. अनेक लोक तर आपल्या मित्रांना मेसेज करून त्यांच्या फोटोला लाईक करायला सांगतात जेणेकरून त्यांचे लाईक्स वाढतील आणि त्यांचे इम्प्रेशन चांगले पडेल. तर, सध्या सगळा खेळ हा लाईक्ससाठी चाललेला आहे. काही महाभाग तर लाईकसाठी काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलून किंवा करून संकटे ओढवून घेतात. अनेकांनी लाईक्ससाठी जीवावर उदार होऊन स्टंट केल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. पण आता हे सगळे बंद होणार आहे मंडळी!! असे काय होणार आहे हेच आम्ही आज बोभाटाच्या वाचकांना सांगणार आहोत... 

मंडळी, याच्यापुढे कुणाच्या पोस्टवर किती लाईक आले हे इतरांना कळणार नाही. स्वतःच्या पोस्टवर आलेले लाईक फक्त तुम्हांला स्वत:ला कळतील. फेसबुकने हे फंक्शन आणण्यासाठी पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. लवकरच फेसबुकवरील लाईक दिसणे बंद होणार आहे.

सद्या एखाद्या पोस्टवर लिस्टमधल्या एका मित्राचे नाव आणि इतर लाईक्सची संख्या असे दिसत होते, पण आता मित्र आणि others एवढेच दिसेल. याचा अर्थ एखाद्याला किती लाईक मिळाले हे त्याला स्वत:ला सोडून दुसऱ्या कुणालाही कळणार नाही.

 

(सध्या अशा पोस्टवर आपल्याला victoria lo and 23 other reacted असं दिसतं, पण हे फीचर आल्यावर victoria lo and other  इतकंच दिसेल. स्त्रोत)

गेल्या काही काळापासून फेसबुककडे अशा तक्रारी जात होत्या की लाईक्ससाठी चढाओढी होतेय. लाईक्स न मिळाल्याने काहीजण निराश होत आहेत. एकंदरीत एकमेकांसोबत तुलना होतेय आणि त्यातून काही चांगलं घडण्यापेक्षा नकारात्मकता वाढतेय. लाईक्ससाठी लोक अनेक संकटे ओढवून घ्यायला मागेपुढे बघत नाहीयेत. या सर्व गोष्टींचा विचार करून फेसबुक हे पाऊल उचलायला जात आहे. फेसबुकने नुकतीच ही गोष्ट कन्फर्म केली आहे. फेसबुक सोबत इंस्टावरसुद्धा हे फिचर येण्याची जाम शक्यता आहे राव!!

जर असे खरेच झाले तर फेसबुकरील समस्त 'नुसता धूर राडा जस्ट नाऊला ऍड करा', 'आयडी रिफ्रेश केली आहे' वगैरे वगैरे म्हणणाऱ्या पप्या गायकवाड मित्र 
मंडळाची जाम गोची होणार आहे. लाइक्सचे हे वेड फक्त तरुण मुलांना नसते, तर भल्याभल्या लेखकांनासुद्धा हा मोह आवरता येत नाही. 

जेव्हा हे फीचर खरोखर येईल तेव्हा लाईकसाठी फेसबुक वापरणारी मंडळी काय करतील हे बघायला मजा येणार आहे. तुम्हांला काय वाटतं??

सबस्क्राईब करा

* indicates required