बँक अकाउंटला आधार लिंक करा नाहीतर पस्तावाल!

लोकहो, हा भारत आहे आणि इथे राहायचं म्हणजे आता तुमचं आधार कार्ड असलंच पाहिजे. प्रत्येक ठीकाणी तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार आवश्यक केलं गेलंय. जर तुम्ही एखाद्या बँकेचे खातेधारक आहात तर येत्या ३० एप्रिलच्या आत तुमच्या बँक अकाउंटला तुमचा आधार नंबर लिंक करून घ्या. नाहीतर हा आळस तुम्हाला महागात पडू शकतो.

       

    रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि आयकर विभागातर्फे ही ३० एप्रिलची डेडलाईन जारी करण्यात आलीय. ३० एप्रिलनंतरही आधार न जोडलेली खाती बँकांकडून ब्लॉक केली जातील. त्यामुळे अजूनही ज्यांनी आपल्या खात्याला आधार नंबर जोडलेला नाहीय, त्यांच्याकडे फक्त १५ दिवसांचा अवधी आहे. सोबतच तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते तुम्हाला ३० जूनच्या आत आपल्या बँक खात्याशी जोडावं लागेल. 

सबस्क्राईब करा

* indicates required