ऐकलं का... पेट्रोल, डिझेलचे भाव आता दररोज बदलणार..

मंडळी, आपल्या देशात आता सोन्या-चांदीप्रमाणे पेट्रोल, डिझेलचे भावही दररोज बदलणार आहेत. येत्या १ मे पासून ही नवीन प्रणाली सुरू होईल अशी चर्चा आहे. इंडियन अॉईल कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम, आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन या तीन प्रमुख तेल कंपन्यांकडून सरकारकडे यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलाय.

           कच्च्या तेलांचे आंतरराष्ट्रीय भाव, चलन विनिमय, या आधारांवरून सद्या आपल्याकडे दर १५ दिवसांनी, म्हणजेच महिन्याच्या १ आणि १६ तारखेला तेलांच्या किंमती ठरवल्या जातात. पण आता या नवीन पध्दतीनुसार हे दर रोज रात्री १२ वाजता आंतरराष्ट्रीय मूल्यांनुसार बदलले जातील. पहिल्यांदा प्रायोगिक स्तरावर ही पध्दत पॉंडिचेरी, विशाखापट्टणम, जमशेदपूर, चंदिगढ, आणि उदयपूर या पाच शहरात राबवण्यात येईल. आणि यानंतर हळूहळू देशातील सर्व ५८,००० पेट्रोल पंपांवर ही पध्दत लागू केली जाईल.

          अन्य विकसित देशांमध्ये अशाच प्रकारे दैनिक पध्दतीने तेलांचे दर बदलतात. किंमती रोज बदलल्यामुळे तेलांच्या दरात फक्त काही पैशांनी चढउतार होतो. त्यामुळे आता आपल्याला अचानक दरवाढीचा शॉक लागणार नाही एवढंच.

सबस्क्राईब करा

* indicates required