व्हिडीओ ऑफ दि डे : पुण्यात गणेश विसर्जनाच्यावेळी नेमकं काय घडलं ? व्हिडीओ पाहून कौतुक कराल !!

गणेशोत्सव आणि महाराष्ट्र यांचे नाते वेगळे सांगण्याची गरज नाही राव!! ११ दिवस महाराष्ट्र गणपतीमय होऊन गेलेला असतो. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्रभर जल्लोष असतो.
शहराशहरांतील मिरवणूका वाजतगाजत मुख्य रस्त्यांवरून जात असल्याने सामान्यांना या गोष्टीचा त्रास पण सहन करावा लागत असतो. यासारख्या गोष्टींमुळे बऱ्याचवेळा सांस्कृतिक उत्सवांवर टीकासुद्धा होताना दिसते.
पुण्यात मात्र एका घटनेने मिरवणूकित नाचणारी मुले असंवेदनशील नसतात हे सिद्ध केले आहे.
#WATCH Maharashtra: Devotees give way to ambulance during Ganesh idol immersion procession on Lakshmi Road in Pune. #GaneshVisarjan (12.09.2019) pic.twitter.com/GqxtN1QmzP
— ANI (@ANI) September 13, 2019
मंडळी झाले असे की, पुण्याच्या लक्ष्मी रोडवर गणपती विसर्जनाची मिरवणूक चालली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हजारो भाविक तिथे उपस्थित होते. ढोल ताशांचा जयघोष सुरू होता. रस्ता जाम झाल्यामुळे अनेक गाड्यांनी आपला रस्ता बदलला होता. अचानक एक अँबुलन्स त्याच रस्त्यावरून जात होती. इतर गाड्यांप्रमाणे अँबुलन्सला देखील रस्ता बदलावा लागेल की काय असे वाटत असताना अगदी काही मिनिटांत रस्ता मोकळा झाला आणि सर्व भाविकांनी अँबुलन्सला वाट मोकळी करून दिली. तर काहींनी अँबुलन्सला वाट काढण्यासाठी मार्गदर्शन केले.
गणेशभक्तांच्या या कृतीचे देशभरातून स्वागत होत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे चौफेर कौतुक होत आहे राव! मंडळी मराठा क्रांती मोर्चावेळीसुद्धा असाच अँबुलन्सला वाट मोकळी करून देण्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. या दोन्ही घटनांवरून मराठी माणूस किती संवेदनशील आहे याची प्रचिती येते.
लेखक : वैभव पाटील