computer

मोबाईल हरवला, चोरीला गेला तर या सोप्प्या पद्धतीने मोबाईल परत मिळवा !!

मंडळी, मोबाईल हरवलाय ? चोरीला गेलाय ? घाबरू नका!! दूरसंचार विभाग तुम्हाला मोबाईल शोधून देईल.

दूरसंचार विभाग २०१७ पासून  Central Equipment Identity Register (CEIR) या डेटाबेसवर काम करत आहे. हा डेटाबेस प्रत्येक मोबाईलला असलेल्या १५ अंकी IMEI (International Mobile Equipment Identity) क्रमांकाचा डेटाबेस असणार आहे.

समजा, तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर तुम्हाला दोनच गोष्टी कराव्या लागतील. आधी तर पोलिसात ताक्रात करून एफआयआर नोंदवा. त्यानंतर दूरसंचारच्या १४४२२ या क्रमांकावर फोन करून त्यांना माहिती द्या. दूरसंचार लगेचच तुमच्या मोबाईलचा IMEI क्रमांक ब्लॉक करेल.

IMEI क्रमांक ब्लॉक केल्याने मोबाईल कोणत्याही नेटवर्कवर काम करणार नाही. त्यामुळे मोबाईल उपयोगाचा राहणार नाही. याच IMEI क्रमांकाने टेलिकॉम कंपन्या नेटवर्क ब्लॉक करू शकतात. यानंतर IMEI क्रमांकाच्या सहाय्याने तुमचा मोबाईल शोधण्यात येईल.

आता हा IMEI क्रमांक कुठून आणायचा ?

मंडळी, फार गोंधळू नका. तुमच्या मोबाईलवर *#06# हा क्रमांक डायल करा. तुम्हाला तुमचा  IMEI क्रमांक मिळेल.

या CEIR डेटाबेसचे आणखी काही फायदे आहेत. जगभरातील मोबाइल नेटवर्क ऑपरेटर्ससाठी काम करणाऱ्या GSMA संस्थेशी CEIR डेटाबेस जोडलेला असेल. GSMA संस्थेकडे जगभरातल्या सर्वच IMEI क्रमांकाची माहिती आहे. जर बनावट मोबाईल तयार करण्यात आला तर GSMA च्या मदतीने त्याची ओळख पटू शकते. याखेरीज फोन हरवल्यास GSMA च्या माध्यमातून शोधता येऊ शकतो.

तर मंडळी, मोबाईल हरवल्यावर लगेचच नवीन मोबाईल घ्यायला धावू नका. जुना फोन मिळण्याची आशा आता वाढलेली आहे.

जाता जाता एक महत्वाची माहिती. CEIR डेटाबेसची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. त्यावेळी CEIR बद्दल आणखी माहिती आम्ही घेऊन येऊ.

सबस्क्राईब करा

* indicates required