दिनविशेष: बुध्द पौर्णिमा - वैश्विक विचारक्रांतीचा दिवस

आज वैशाख शुध्द पौर्णिमा, बुध्द पौर्णिमा. आजचा दिवस हा वैश्विक विचारक्रांतीचा दिवस आहे. आजच्या दिवशी काही हजारो वर्षांपूर्वी ध्यानमग्न बुध्दाला ज्ञान (संबोधी ) प्राप्त झाले. दु:खाचे मूळ आणि त्या मूळाला नाहीसे करण्याचा मार्ग बुध्दाला सापडला. 
बोधीवृक्षाखाली तपाचरण करणार्‍या बुध्दाला संबोधीज्ञान प्राप्त झाले म्हणजे  चार आर्यसत्यांचा साक्षात्कार आज झाला. 


- पहिले आर्यसत्य: सर्वत्र चालू असलेले भांडण तंटे हे दु:खाचे मूळ कारण आहे .
- दुसरे आर्यसत्य :  तृष्णा हे दु:खाचे मूळ आहे.  
- तिसरे आर्यसत्य : ज्या कार्यकरणाने दु:ख जन्मास येते त्या कारणाचा निरोध करता येतो. 
- चौथे आर्यसत्य : जर दु:खाचा निरोध करता येतो तर तो करण्याचा मार्गही असला पाहीजे. हा म्हणजे आर्य अष्टांगीक मार्ग होय. 

संदर्भ : मराठी विश्वकोश -महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

सबस्क्राईब करा

* indicates required