computer

शिस्तबद्ध म्हणून प्रसिद्ध असलेली देवगडची दिंडी !!

Subscribe to Bobhata

महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडी-देवगड परिसरात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येते.

ज्ञानोबा माऊली... तुकारामाचा जयघोष करीत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे होते. या दिंडीमध्ये सुमारे १ हजार ४०० महिला - पुरुष भाविकांचा समावेश असतो  प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह पालखीमध्ये  ठेवण्यात अलेल्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. दिंडीच्या स्वागतासाठी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याचे अग्रभागी अश्व, झांज पथक, बँण्डपथक, पांढराशुभ्र पोशाख घालून शिस्तीत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत चाललेले झेंडेकरी, भजनी मंडळाचे पथक त्यामागे दिंडीत सहभागी वारकरी भाविक, डोक्यावर तुलसी कलश घेत नामस्मरण करणा-या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते.

या वर्षी दिंडी नेहेमीप्रमाणे जाऊ शकणार नाही म्हणून गेल्या वर्षी च्या दिंडीची काही क्षणचित्रे आज आम्ही देत आहोत.

फोटो आणि लेखन : महेश भुसारी 

सबस्क्राईब करा

* indicates required