computer

देवासारखा धावून आलेल्या अप्पूला कुत्रा म्हणाल का ? असा अप्पू आपल्या घरात हवाच असं तुम्हालाही वाटेल !

माणसांव्यतिरिक्त माणसाचा जिवाचा जिवलग म्हणजे कुत्रा ! एकवेळ माणसे गद्दारी करतील पण कुत्रा कधीही घात करत नाही हे कुणीही नाकारणार नाही. वेळोवेळी या गोष्टीचा अनुभव लोकांना येत असतो. अनेक सिनेमांची थीम पण या विषयावर बेतलेली आहे. कुत्र्यांच्या प्रामाणिकपणाची प्रचिती देणारी अजून एक घटना बंगळूरूत घडली आहे. 

बंगळुरूत  घडलेल्या या प्रसंगात अप्पू नावाचा फक्त दीड वर्ष वय असलेल्या या कुत्र्याने एखाददुसऱ्या नाही तर पूर्ण अपार्टमेंट बिल्डींगच्या दीडशे लोकांचे जीव वाचवले आहेत.

येथील एका अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती.घरमालक विजय पिल्लई यावेळी घरात नव्हते. त्यांची ६० वर्षांची आई आपल्या रूममध्ये झोपली होती.यावेळी अप्पू तिथे होता.कुत्र्यांची घ्राणेंद्रिये अत्यंत तीक्ष्ण असतात त्यामुळे आग लागल्याचं अप्पूच्या लक्षात आल्यावर  समजल्यावर त्याने जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. अप्पूच्या या ओरडण्याने आईला जाग आली. त्यांनी आग लागलेली पाहिली आणि लागलीच त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना या गोष्टीची माहिती दिली.वेळेवर फायर ब्रिगेडला संपर्क करण्यात आला.दोन तासांच्या कसरतीनंतर ही आग आटोक्यात आणता आली. या अपार्टमेंटमध्ये ५० घरे आहेत. जवळपास दीडशे लोक येथे राहतात.

घटना घडल्यावर सर्व रहिवाश्यांकडून अप्पूचे आभार मानले जात आहेत.अप्पूने वेळेवर सतर्क केले नसते तर मोठी जीवितहानी होऊ शकली असती. एका कुत्र्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव वाचवल्याने ही घटना देशभर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required