computer

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलने सादर केलेली १४ अफलातून डुडल्स.. मानलं राव..!!

आपला ७० वा स्वातंत्र्यदिन उद्यावर येऊन ठेपलाय. राजधानी दिल्लीत तयारी चालू आहे. रस्त्यांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवायला सुरुवात केली आहे. विविध ठिकाणी उद्या कोण कोणते कार्यक्रम करायचे याचं वेळापत्रक ठरून सज्ज झालंय. शाळांमधून कॉलेजमधून उद्या जे भाषण करणार आहेत त्यांची रिहर्सल सुरु असेल. एकीकडे हे सगळं चालू असताना आपली शाळेतली बच्चा पार्टी उद्या कोण गांधीजी बनणार, कोण नेताजी, कोण चाचा नेहरू आणि कोण सरदार पटेल हे ठरवण्यात बिझी आहेत.

गुगलही यात मागे नाही मंडळी. उद्या कोणता डूडल टाकायचा याचं तेही प्लॅनिंग करत असतील, एव्हाना तयारही असेल राव. गुगल दर वर्षी भारताच्या स्वातंत्र्यदिनी एक खास डूडल टाकतं. यावर्षी कोणतं असेल याची उत्सुकता तर आहेच पण त्याआधी बघूयात मागील काही वर्षांपासून भारतीय स्वातंत्र्य दिनाला समर्पित केलेले हे काही खास डूडल्स :

१. २००३

पुढे २००५ साली आलेला डूडल २००३ च्या डूडलशी मिलता जुळता होता. फरक एवढाच की फडकणारा झेंडा त्यात नव्हता.

मंडळी हे एकमेव डूडल आहे जे जगभरात दाखवण्यात आलं. या पुढील सर्व फक्त भारतात दिसले आहेत.

२. २००५

२००४ साली डूडल बनवण्यात आला नव्हता. २००५ च्या या डूडल मध्ये गुगलच्या 'O' या अक्षरात अशोक चक्र दिसत आहे.

३. २००६

या डूडल मध्ये हुशारीने अशोक चक्रालाच इंग्रजी 'O' गृहीत धरण्यात आलंय !!

४. २००७

२००७ साली ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डूडल वर स्वातंत्र्याची ६० वर्ष साजरी करण्याबाबत लिहिलेलं आपण पाहू शकतो.

५. २००८

६. २०१०

२००४ प्रमाणे २००९ साली एकही डूडल नव्हतं. भारताच्या स्वातंत्र्य दिनासाठी विविध ढंगी डूडल बनवण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने २०१० पासून झाली असं म्हणता येईल.
ही पहिली GIF डूडल असून यात इंग्रजी 'O' च्या जागी आपले राष्ट्रीय फुल कमळ दिसत आहे.

७. २०११

या डूडल मध्ये पहिल्यांदाच तिरंगा नसून देशातील स्मारकाचा वापर केला गेला आहे.

८. २०१२

सर्वांग सुंदर असं हे डूडल आहे. गुगलच्या 'G' दर्शवण्यासाठी मोराचा उपयोग केला गेलाय आणि संपूर्ण डूडलला तिरंग्याची झाक आहे.

९. २०१३

या डूडल मध्ये सुंदरश्या तिरंगा असलेल्या रिबन मध्ये गुंतलेली अक्षरं आहेत.

१०. २०१४

स्वतंत्र भारतातील पहिल्या पोस्टाच्या तिकिटाचा आणि शिक्याचा वापर या डूडल मध्ये हुशारीने केला गेलाय.

११. २०१५

स्वातंत्र्याचं प्रतिक म्हणून दांडी यात्रेचं चित्र आपण पाहू शकतो. यात गांधीजींपासून मागे प्रत्येकाला दिलेला एक प्रकारचा रंग हा गुगलच्या रंगाशी मेळ खाताना आपण पाहू शकतो.

 

१२. २०१६

भारतीय संसद भवनात जवाहरलाल नेहरूंनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून गुगलने हे डूडल स्वातंत्र्यदिनी समर्पित केलं आहे.

१३. २०१७

२०१७ च्या डूडल मध्ये 'पेपर-कट-आर्ट' द्वारे तयार केलेलं संसद भवन होतं. या डूडल मध्ये दोन्ही बाजूला आपला राष्ट्रीय पक्षी मोर सुद्धा दिसत आहे. 

१४. २०१८

२०१८ सालच्या डूडलची खासियत म्हणजे हे डूडल भारतातल्या ट्रक आर्टवरून प्रेरित आहे. ट्रकच्या मागे केल्या जाणाऱ्या कलाकारीतून खास स्वातंत्रदिनाचं डूडल तयार करण्यात आलंय.

 

आता उत्सुकता आहे ती उद्याच्या डूडलची !!

सबस्क्राईब करा

* indicates required