computer

DSLR कॅमेरा घ्यावा की मिररलेस SLR कॅमेरा? गोंधळ आहे? मग जाणून घ्या दोघांचे फायदेतोटे!!

एक काळ असा होता की फोटो काढणे म्हणजे एक सोहळा असायचा. सगळेजण आवरून सावरून खास फोटो काढायला एकत्र जमत. त्या काळात कॅमेरा ही एक चैनीची बाब होती. पण जसा काळ पुढे सरकत गेला कॅमेऱ्यात अनेक बदल झाले. आज फोनमुळे प्रत्येक हातात कॅमेरा आला आहे. पण सध्याच्या डिजिटल युगात फोटोग्राफी करण्याकरता नवनवीन वैशिष्ट्य असणारे कॅमेरे असतात. आज आपण DSLR आणि मिररलेस कॅमेऱ्याची ओळख करून घेऊयात.

आपल्याला कॅमेराचे अनेक प्रकार असतात हे माहिती असेल. पण त्यांची नावे फारशी माहिती नसतात. कॉम्पॅक्ट कॅमेरा, ब्रिज कॅमेरा, इन्स्टंट कॅमेरा किंवा मग फिल्म कॅमेरा. यापैकी बरीच नावं आपल्याला माहित असायची गरज नाही. व्यावसायिक फोटोग्राफी करणाऱ्या कॅमेराप्रेमींना या सगळ्यांची खडानखडा माहिती असू शकते. त्यातला त्यात DSLR कॅमेरा हल्ली लोकप्रिय आहे. तो कसा वापरायचा हे बऱ्यापैकी लोकांना माहीत असतं आणि बरेचजण आपली फोटोग्राफीची अपूर्ण राहिलेली हौस पूर्ण करण्यासाठी हा कॅमेरा विकत घेताना दिसतात.

काही वर्षांपूर्वी जास्त वापरला जाणारा साधा कॅमेरा म्हणजेच SLR कॅमेरा हा काळाच्या पडद्याआड गेलाय. तुम्हांला आठवत असेल तर त्यात जास्तीत जास्त ३६ फोटो काढता यायचे. त्यातही पहिला फोटो हमखास खराब यायचा. त्यातही एखादा आवडला नाहीय तर डिलीट करुया असा काही ऑप्शन नव्हता. त्यात फोटो साठवण्यासाठी प्लास्टिक फिल्मचा वापर केला जायचा.

पण आता डिजिटल युगात SLR जाऊन नावाप्रमाणेच DSLR हा कॅमेरा आला. हा सगळ्याच दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा आहे. यात तुम्ही कितीही फोटो तुम्ही काढू शकता, चांगला आला की नाही ते पाहू शकता, आवडला नाहीय तर डिलीट पण करू शकता. अर्थात यासाठी लागतं ते मेमरी कार्ड. जो या DSLR चा सगळ्यात मोठा फायदा आहे.

DSLR मधे Mirror Mechanism हा जास्त महत्वाचा असतो. आपण viewfinder म्हणजेच eyepiece मधून जेव्हा बघतो तेव्हा तेवढंच बघतो की जे आपल्याला कॅप्चर करायचं आहे. फोकस करून झाल्यावर क्लिक केल्यावर ज्याचा फोटो काढतोय त्याची लाईट लेन्समधून सरकत Reflex mirror वर पडते. आता हा Reflex mirror आपली भूमिका चोख बजावत त्याच्याकडे आलेली लाईट पुढे पेंटाप्रिझमकडे सरकवतो. जेव्हा लाईट बीममधून पास होते तेव्हा ती ९०° मध्ये रिफ्लेक्ट करण्यात पेंटाप्रिझमचा म्हणजे पाच बाजू असलेल्या प्रिझमचा हात असतो. फोटो क्लिक केल्यावर Reflex mirror आपोआप वरती सरकून लाईट थेट पास होते, मग शटर वरती होऊन लाईट इमेज सेन्सरपर्यंत पोहचते. इमेज सेन्सर जेवढा वेळ लावेल हवी ती इमेज कॅप्चर करण्यासाठी तेवढा वेळ शटर खुलं राहातं, नंतर आपोआप शटर बंद होतं आणि Reflex mirror आपणहून ४५° मध्ये पुन्हा सेट होतो जो नेहमीप्रमाणे Viewfinder कडे लाईट पास करत राहतो. तर एवढं सगळं घडल्यावर DSLR मध्ये फोटो काढला जातो.

फोटो क्लिक केल्यावर  Reflex mirror आपोआप वरती सरकून लाईट थेट पास होते, मग शटर वरती होऊन लाईट इमेज सेन्सरपर्यंत पोहचते. इमेज सेन्सर जेवढा वेळ लावेल हवी ती इमेज कॅप्चर करण्यासाठी तेवढा वेळ शटर खुलं राहातं, नंतर आपोआप शटर बंद होतं आणि Reflex mirror आपणहून  ४५° मध्ये पुन्हा सेट होतो जो नेहमीप्रमाणे Viewfinder कडे लाईट पास करत राहतो.   तर एवढं सगळं घडल्यावर DSLR मध्ये फोटो काढला जातो. 
आ्ता नविन लॉन्च झालेल्या मिररलेस कॅमेऱ्यात नावाप्रमाणेच मिररच नाहीय. हा कॅमेराप्रेमींच्या बराच पसंतीस उतरला आहे. त्यात सगळ्यात मोठं कारण असेल तर ते या कॅमेऱ्याचा असलेला छोटा आकार आणि स्लिम बॉडी. "मिररलेस" म्हणजेच DSLR सारखं यात Mirror Mechanism नसतो. तुम्हांला स्वतःला viewfinder मध्ये बघून फोकस करण्याची गरज नसते. ते काम या कॅमेरात असलेला EVF, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्युफाईंडर आपोआप करतो. तो ते सगळं कॅप्चर करतो. Mirror नसल्यामुळे mirror mechanism मधे होणारी पुढची प्रक्रिया इथं होत नाही. तो स्वतः फोकस करून उत्तम असे High definition चे फोटो किंवा व्हिडिओ शुट करतो. ज्यामुळे तुमचा बराच वेळ वाचतो. वाईल्डलाईफ फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी, शूट, फोटो जर्नालिझम, किंवा मग स्ट्रीट फोटोग्राफी या सगळ्यात मिररलेस कॅमेरा आपली वेगळी कमाल दाखवतो.

 रिफ्लेक्स मिरर, पेंटाप्रिजम असे अनेक पार्ट मिररलेसमधून गाळले गेल्यामुळे तो वजनानेही बराच हलका असतो. असं असलं तरी बॅटरी बॅकअप हा एक याचा ड्रॉबॅक सुद्धा आहे. DSLR च्या तुलनेत मिररलेस कॅमेराची बॅटरी लवकर संपते, कारण याचे फंक्शन्स हे इलेक्ट्रॉनिकली होत असतात ज्यासाठी जास्त बॅटरी वापरली जाते.
   कधी कधी जास्त उन्हात मिररलेस कॅमेरामधून काढलेले फोटो तेवढे चांगले येत नाहीत. तर कधी फास्ट आणि स्पीडमधे शूट केलेला एखादा विडिओ शटरवर ताण आल्यामुळे फसूही शकतो. त्यामुळे मिरर लेसचं येणार नविन Version हे या सगळ्याचा विचार करून लॉन्च होईल, पण त्याची किंमत DSLR पेक्षा नक्कीच खूप जास्त असेल. 
  प्रत्येक गोष्टीचे फायदे, तोटे हे असतातच .त्यामुळे तुमची आवड, गरज आणि किंमत यानुसार तुम्ही DSLR कि MIRROR LESS LSR घ्यायचा हे ठरवू शकता.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required