computer

ज्या फोटोसाठी तो ७ वर्ष थांबला तो फोटो प्रत्येकाने एकदा बघितलाच पाहिजे !!

तुम्ही जर फोटोग्राफर असाल तर तुम्हाला त्या एका खास क्लिकची किंमत नक्कीच माहित असेल. प्रत्येक फोटोग्राफरला असा एकमेवाद्वितीय क्षण टिपायचा असतो. दुबईतल्या एका फोटोग्राफरला सुद्धा असाच एक क्षण टिपायचा होता. तो योग गेल्या आठवड्यात आला.

सध्या दुबईत जोरदार पाऊस पडतोय, विजा कडाडतायत. गेल्या शुक्रवारी विजा कडाडत असताना एक दुर्मिळ गोष्ट घडली. बुर्ज खलिफाच्या अगदी टोकावर वीज कोसळली. या क्षणाची गेल्या ७ वर्षांपासून वाट बघणाऱ्या जोहैब अंजुम या फोटोग्राफरने हा क्षण यशस्वीपणे आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. त्याने घेतलेला हा अफलातून फोटो पाहा.

जोहैब अंजुम हा गेल्या ७ वर्षांपासून  या क्षणाची वाट बघत होता. तो दर पावसाळ्यात दुबईच्या बाहेर तंबू ठोकून बसायचा. वीज कोसळण्याचे क्षण बरेचदा आले पण बुर्ज खलिफाच्या अगदी टोकावर वीज कोसळल्याचा तो क्षण यायला मात्र ७ वर्षे लागली.

असाच एक फोटो खुद्द दुबईचा प्रिन्स ‘शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम’ याने टिपला आहे. हा पाहा फोटो.

या दुर्मिळ क्षणाला टिपण्यासाठी अनेकजण सरसावले होते. काही मोजके व्हिडीओ पाहून घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required