computer

वन प्लस सेव्हन बाजारात....तुम्ही का घ्यावा आणि का घेऊ नये ??

सध्या मोबाईलचे जग आहे. अन्न वस्त्र निवारा नंतर मोबाईलसुद्धा आता माणसाची मूलभूत गरज होऊन गेला आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. आणि अशात मग एक से बढकर एक मोबाईल मार्केटमध्ये आले नाहीत तर नवलच!! मोबाईल कंपन्यांमध्ये रोजच्या रोज नविन फिचर्सचा मोबाईल मार्केटमध्ये आणण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत असते. या  चढाओढीत वन प्लस या कंपनीने आपले मोबाईल मार्केटमध्ये आणायला सुरवात केली आणि बघता बघता पूर्ण बाजारपेठ काबीज केली. थेट ॲपलला टक्कर देणे म्हणजे सोपे काम नाही भाऊ!! पण वन प्लसच्या मोबाईल्सनी ॲपलच्यासुद्धा नाकात दम करून ठेवला आहे. आता पुन्हा वन प्लसने त्यांचा नवीन मोबाईल बाजारात आणला आहे. त्याचे नाव आहे वन प्लस सेव्हन!

तुम्हाला वाटेल या वन प्लस कंपनीच्या मोबाईल्समध्ये  इतके प्रसिद्ध होण्यासारखे असे काय विशेष आहे? तर त्यांची विशेषता आहे कमी किंमतीत जास्तीतजास्त फिचर्स देणे. तर मंडळी, चला बघूया या वन प्लस सेव्हनमध्ये असलेल्या फिचर्सबद्दल काही नविन गोष्टी.

वन प्लसने भारत, अमेरिका आणि युरोपमध्ये सोबतच हा मोबाईल लाँच केला आहे. ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर एक खास पेजच यासाठी बनविण्यात आले आहे. वन प्लस सेव्हन प्रोमध्ये तीन रियर कॅमेरे, पॉप-अप सेल्फी कॅमेरा,  तर वन प्लस सेव्हनमध्ये दोन रियर कॅमेरे आणि वॉटरड्रॉप नॉच सोबत लाँच केला आहे. 

वन प्लस सेव्हन आणि वन प्लस सेव्हन प्रोच्या किंमती

स्रोत

भारतात लाँच करण्याआधीच वन प्लस सेव्हनची किंमत लिक झाली होती. कंपनीने तीन कॅटेगऱ्यांमध्ये मोबाईल आणला आहे. 6 gb + 128 gb ची किंमत 48, 999 रुपये, 8 gb+ 256 gb ची किंमत 52,999 रुपये आणि 12 gb + 256 gb ची किंमत 57,999 ठेवण्यात आलेली आहे. 

वन प्लस सेवन प्रोचे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले -  6.67-इंच HDR10+ स्क्रीन, 1440x3120 पिक्सल

प्रोसेसर  - क्वालकॉम SDM855 स्नॅपड्रॅगन 855, ऑक्टा-कोर 2.84GHz

रॅम आणि स्टोरेज  - 6/8/12GB, 128/256GB

कॅमेरा  - 48+8+16MP ट्रिपल रियर, 16MP फ्रंट

ओएस-  एंड्रायड 9.0 पाय

बॅटरी  - 4000mAh, 30 वॉट चार्जर

 

बॉक्समध्ये काय येईल?

कंपनीने वन प्लस सेवन प्रोचा बॉक्स खूप स्टायलिश बनवला आहे आणि मोबाईलच्या मानाने मोठा सुद्धा आहे, कारण त्याच्या आत आणखी बॉक्सेस दिलेले आहेत. बॉक्स ओपन केल्यावर तुम्हाला आत गो बियॉन्ड स्पीड लिहिलेले दिसेल. बॉक्सच्या आत एक रिव्यूवर गाइड, क्लीनिंग क्लॉथ, बुलेट वायरलेस हेडफोन,  कारसाठी 30 वॅटचे चार्जर तसेच मेन बॉक्सच्या खाली एक ट्रे आहे ,त्यात मोबाईलच्या दोन केसेस दिल्या आहेत. आणखीही काही लहानसहान गोष्टी दिल्या आहेत.

कॅमेरा

मंडळी, सध्या कॅमेरा फोनचा जमाना आहे.  त्यात मग वन प्लस कसे मागे राहिल? वन प्लस सेवनचा कॅमेरा खूप पॉवरफुल आहे. याच्यात ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे, ज्याच्यात 48 मेगा पिक्सलची लेन्स आहे. अंधारात फोटोची क्वालिटी चांगली यावी यासाठी ड्युअल LED ड्युअल टोन फ्लॅश दिलेला आहे. सेल्फिसाठी याच्यात मोटोराइज्ड 16 मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा दिलेला आहे. 

ऑपरेटिंग सिस्टीम आणि बॅटरी

बॅटरी  बॅकअप जास्त असणे सद्या गरजेचे झाले आहे. जवळपास सगळीच कामे आता मोबाइलवर होऊ लगल्याने चार्जिंगचा मोठा प्रश्न उभा राहिलाय.  पण आता तो पण प्रश्न वन प्लसने सोडवला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्सीजन 9 ऑपरेटिंग सिस्टीम दिली आहे. तब्बल 4000 MAh नॉन रिमूवेबल बॅटरी सोबत देण्यात आली आहे. त्याबरोबरच फ़ास्ट चार्जिंगसाठी याच्यात 30 वॅटचा चार्जर दिला आहे. मोबाईलमध्ये ड्युअल स्पीकर  डॉल्बी साऊंड सिस्टीमसोबत दिला आहे.

हा मोबाईल का घ्यावा?

पॉवरफुल कॅमेरा हा आजची गरज होऊन बसला आहे. आठवणीतले क्षण कॅमऱ्यात कैद करण्यासाठी सगळे धडपड करीत असतात.  तुमची आवड कॅमरा असेल तर या स्मार्टफोनमध्ये दमदार कॅमेरा दिलेला आहे.

मोठ्या डिस्प्लेची आवड असल्यास हा मोबाइल उत्तम आहे.  दमदार प्रोसेसर ही अजुन एक जमेची बाजू याच्यात आहे. 12 gb रॅम असल्याने स्टोरेजचा प्रश्नच मिटतो. भारतातला सर्वाधिक रॅम असलेला फोन अशी याची नोंद झालेली आहे. 

का घेऊ नये?

याच्यात हेडफोन जॅक दिलेला नाही. हेडफोन चार्ज करण्याची सवय नसलेल्यांना थोडा त्रास होऊ शकतो.  IP रेटिंग सध्याच्या काळात महत्वाची मानली जाते. ती पण याच्यात नसल्याने या गोष्टीचा पण विचार होणे गरजेचे आहे. IP रेटिंग म्हणजे तुमचा मोबाईल धूळ, पाणी अशाच्या माऱ्यात किती कणखर राहू शकतो. IP रेटिंग असेल तर त्यात खूप कमी धूळ जाऊ शकते, तर IP रेटिंग ८ असेल तर तो काही मिनिटं पाण्यातही राहू शकतो. मोबाईल बरोबर मेमरी स्लॉट नाही, म्हणजे तुम्ही बाहेरुन मेमरी कार्ड टाकू शकत नाही. 

 

मित्रांनो सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यावर निष्कर्ष काढता येतो कि वन प्लस सेवन प्रो हा २०१९ सालातला सर्वाधिक पॉवरफुल मोबाईल आहे. याला कंपनीने 'गो बियॉन्ड स्पीड' असा टॅग दिला आहे. त्याच्यावर  हा फोन खरा उतरताना दिसत आहे. कंपनीने हा मोबाईल बनवताना बारकाईने प्रत्येक गोष्टींची काळजी घेतली आहे. याच्यात देण्यात आलेल्या फीचर्सच्या मानाने खूप कमी किमतीत हा मोबाईल उपलब्ध आहे आहे. जर तुम्ही नविन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर वन प्लस सेवन प्रो खूप चांगला पर्याय आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required