computer

फेसबुकचं नवं फीचर - फेसबुक शॉप्स. लहानमोठे उद्योग कसे, कुठे आणि केव्हा हे वापरू शकेल? वाचा सविस्तर माहिती.

कोरोना महामारीच्या काळात लहान-मोठे ‌उद्योगधंदे ठप्प झालेत. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यावसायिकांवर हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आलीय. पण याच संकटाला संधीत रूपांतर करण्याच्या हेतूनं लहान, मध्यम आणि मोठ्या अशा सर्वच प्रकारच्या व्यायसायिकांसाठी फेसबुकनं आणलंय फेसबुक शॉप. 

काय आहे फेसबुक शॉप?

फेसबुक शॉप ही एक अशी सेवा आहे जिथं छोटे व्यायसायिक किंवा मोठे ब्रॅण्ड, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आपलं अॉनलाईन दूकान थाटू शकतात. या माध्यमातून त्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं आणि उत्पादनांची अॉनलाईन विक्री हवी तिथे आणि हवी तेव्हा करणं शक्य होणार आहे. आणि हि सेवा त्यांना विनामूल्य वापरता येईल.

हे फेसबुक शॉप कसं वापरता येईल?

व्यावसायीकाने आपल्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टाग्राम प्रोफाईलवर उत्पादनांसोबतच आपल्या अॉनलाईन स्टोअरची रचना करायची आहे. त्यानंतर ग्राहकांना संबंधीत व्यवसायाच्या पेज/प्रोफाईलवर वर View Shop हे बटन‌ उपलब्ध होईल. या बटनावर क्लिक करून ते‌ विक्रेत्यांच्या अॉनलाईन दुकानाला भेट देऊ शकतील, विक्रीला उपलब्ध असणारी उत्पादनं पाहू शकतील, आवडल्यास सेव्ह करून ठेवू शकतील किंवा थेट अॉर्डर प्लेस करून‌ चेक आऊटही करू शकतील. हे शॉप फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्टोरीजद्वारे‌ किंवा पेड जाहिरातींच्या स्वरूपातही लोकांपर्यंत पोहोचवता येतील.

ग्राहक फेसबुक मेसेंजर‌‌ आणि इन्स्टाग्रामवर डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून विक्रेत्याशी थेट संपर्क साधून उत्पादनांची माहिती, अॉर्डर ट्रॅकींग, आणि डिलीव्हरी संबधीत इतर माहिती मिळवू शकतात. लवकरच यात व्हाट्सअॅपचा समावेशही करण्यात येईल.

कधी उपलब्ध होणार?

फेसबुकने या सेवेचं रोल-आऊट सुरूही केलंय. लवकरच जगभरातल्या सर्व विक्रेत्यांसाठी ते उपलब्ध होईल. जगभरात फेसबुकचा वापर  २.५ बिलीयन युजर्स करतात.

 त्यामुळे ग्राहकांपर्यंत आपली उत्पादनं पोहोचवण्यासाठी विक्रेत्यांना मोठं माध्यम मिळणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required