१०,००० मोबाईल वापरून चायनावाले आपली फिरकी घेतायत...वाचा काय आहे 'फेक लाईक फॅक्ट्री' !!!

सोशल मिडीयाच्या जमान्यात ट्रेंडिंग राहायचं असेल तर लाईक, शेअर, कमेंट या तिन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत बॉस !!! आपल्या फोटोला माणसांनी भरभरून लाईक किंवा ‘रियॅक्शन्स’ द्यावेत म्हणून माणसं लोकांना टॅग वर टॅग करत सुटलेत. या सर्व कष्टांवर रामबाण उपाय म्हणून चीनमधल्या एका कंपनीने फेक लाईक देण्याची फॅक्टरीच उघडलीय.

 

काय आहे ‘फेक लाईक फॅक्ट्री’ ?

Image result for click farm' of 10,000 phonesस्रोत

खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असा सारा प्रकार आहे हा. आपलं प्रॉडक्ट माणसांना किती आवडलं आहे हे दाखवण्यासाठी केलेला झोल म्हणजे फेक लाईक फॅक्ट्री.

या चायनीज कंपनीकडे १०,००० फोन आहेत. आणि यांना फक्त २ कम्पुटरद्वारे नियंत्रित केलं जातं. प्रत्येक फोनमध्ये वेगवेगळे युझर अकाऊन्ट आहेत. याचा फायदा म्हणजे एकच माणूस, एकाच प्रॉडक्टला, एकाच वेळी हजारो लाईक देऊ शकतो. लाईक बरोबर कमेंट देणे, अॅपला 5 स्टार रेटिंग देणे असले उद्योगही इथे केले जातात.

स्पर्धा किती टोकाला पोहोचली आहे याचे अगदी गरमागरम उदाहरण आहे हे. सध्या तरी या फेक लाईक फॅक्ट्रीचा उपयोग 'WeChat' साठी केला जातोय अशी माहिती आहे, पण काही दिवसात असेच काही फेसबुकवर बघायला मिळाल्यास नवल वाटणार नाही.

म्हणून सांगतो.. पूजा कुमारी, एंजल प्रिया सारख्या अकाऊन्ट पासून सावध राहा, कोणास ठाऊक यापाठी कोणता चायनीज माणूस तुमची फिरकी घेत असेल !!!

सबस्क्राईब करा

* indicates required