computer

रितेश भाऊ 'शाकाहारी मटण' विकतोय....काय आहे हे नवीन प्रकरण ?

जगभरात लोकांचे शाकाहारी होण्याचे प्रमाण वाढत आहे. मांसाहार करणाऱ्यांचे मांसाहारावर किती प्रेम असते हे सगळ्यांनाच माहित आहे. अशावेळी मांसाहार सोडणे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसते. ही समस्या सगळ्यांनाच असते, मग तो अगदी बॉलिवूडचा स्टार रितेश देशमुख का असो!!! यावर उपाय म्हणून रितेशने एक भन्नाट गोष्ट शोधून काढली होती. आता हीच गोष्ट बिझनेसच्या माध्यमातून तो भारतीयांसाठी घेऊन येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

रितेश म्हणतो की चार वर्षांपूर्वी जेव्हा मी आणि जेनेलियाने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी जेनेलियाला ही गोष्ट कठीण गेली नाही, पण मी कबाब, खिमा सारख्या गोष्टी खूप मिस करत होतो. मग त्याने काही इंटरनॅशनल उत्पादने खाऊन पाह्यली. या पदार्थांचा स्वाद तर मांसासारखा असतो, पण खरंतर त्यात मांस नसते. आता हाच नविन व्यवसाय रितेश आणि जेनेलिया सुरू करत आहेत.

प्लांट बेस्ड वेगन प्रॉडक्ट असं या प्रकाराचं नाव आहे. यात सगळ्या गोष्टी या पूर्णपणे झाडांपासून मिळणाऱ्या विविध गोष्टींपासून बनवलेल्या असतात. उदा. कोकोनट ऑइल, हरभऱ्याचे प्रोटीन इत्यादी. यांची चव अस्सलपणाच्या इतकी जवळ जाते की अगदी खवय्या मांसाहारी व्यक्तीलाही आपण खरंतर शाकाहारी खाद्य खात आहोत हे कळत नाही.

जेनेलिया आणि रितेशभाऊंनी ADM नावाची अमेरिकन कंपनी आणि गुड फूड यांच्यासोबत करार केला आहे. या कंपनीसोबत मिळून लवकरच हे दोघे झाडांपासून बनलेले कबाब, बिर्याणीसारखे पदार्थ तयार करणार आहेत.

झाडांपासून तयार होणारे ही उत्पादने जगभर प्रसिद्ध होत आहेत. पशुप्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. रितेशने या कंपनीचे नाव इमॅजिन मीट्स(Imagine Meats) असं ठेवलं आहे. हे प्रॉडक्टस आरोग्यासाठीसुद्धा खूप चांगले आहेत. आपल्या या लाडक्या मराठमोळ्या जोडीने हे प्रॉडक्ट्स देशभरात प्रसिद्ध करण्याचा चंग बांधलाय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

पाहा लोक्स, कदाचित तुम्हांला श्रावण पाळायची गरज भासणार नाही!!

सबस्क्राईब करा

* indicates required