f
computer

तिने तब्बल एवढे तास नृत्य करून केला विश्वविक्रम !!

मंडळी, नेपाळच्या एका मुलीने आपल्या डान्सच्या आवडीला एका नव्या उंचीवर नेलं आहे. तिने तब्बल १२६ तास नृत्य करून विश्वविक्रम केला आहे. १२६ तास म्हणजे तब्बल ५ दिवस राव. कोण आहे ती मुलगी, चला पाहूया !!

तिचं नाव आहे बंदना (वय वर्ष १८). ती खरं तर बिझनस मॅनेजमेंटची विद्यार्थिनी आहे, पण लहानपणापासून तिला नृत्य आवडतं. तिला नेपाळी संगीत आणि नृत्य जगभरात पोहोचवण्याची इच्छा आहे. याचीच पहिली सुरुवात म्हणजे हा विश्वविक्रम आहे. तिने २३ नोव्हेंबर २०१८ पासून ते २८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सलग ५ दिवस नेपाळी संगीतावर नृत्य केलं. नुकतंच तिच्या या विश्वविक्रमावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झालंय.

मंडळी, बंदनाच्या आई आणि आजीने तिच्या यशाबद्दल सांगितलं की “पूर्वी मुलींना सार्वजनिक ठिकाणी नाचायचं तर सोडा, पण साधं हसण्याची पण परवानगी नव्हती. आता जग बदललं आहे.” त्यांना बंदनाच्या या यशाबद्दल आनंद होतोय.

मंडळी, हा विश्वविक्रम यापूर्वी भारतातल्या कालामंडलम हेमलता यांच्या नावे होता. २०११ साली त्यांनी तब्बल १२३ तास आणि १५ मिनिटे नृत्य केलं होतं. त्यांनी मोहिनीअट्टम हे पारंपारिक नृत्य सादर केलं होतं.

मंडळी, बंदनाच्या यशामध्ये भारताचा पण थोडा वाटा आहेच. तो असा की तिच्या नृत्याची तालीम नेपाळ आणि भारत अशा दोन ठिकाणी झाली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required