गुगल मध्ये चक्क बकऱ्या काम करतात ? जाणून घ्या गुगलवर बकऱ्यांना नोकरी देण्याची वेळ का आली !!

मंडळी, अमुक अमुक इंजिनियरला गुगलने नोकरी ऑफर केली किंवा तमुक मुलाची गुगलने मदत घेतली. अशा बातम्या अधून मधून येतच असतात. गुगल जगभरातून अगदी काळजीपूर्वक माणसांची निवड करतं. गुगलला माणसं आणि मशीन्स या दोनच गोष्टींची आवश्यकता असते. मग त्यांना बकऱ्यांची गरज का लागली असावी राव ?

मंडळी, गुगलचा हा किस्सा फार जुना आहे. २००९ साली गुगलने २०० बकऱ्यांना नोकरी दिली होती. या बकऱ्यांच काम म्हणजे गूगलप्लेक्स ऑफिसच्या पार्कमधील गवत खाणे. गुगल सारख्या जायंट सर्च इंजिनकडे अत्याधुनिक मशिनरी असताना त्यांनी बकऱ्यांना नोकरी का दिली ?

स्रोत

त्याचं काय आहे ना, मशीनमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण होतं. बकऱ्यांमुळे गवत कापलं सुद्धा जातं आणि मशीनमुळे वाढणारा खर्च व प्रदूषण सुद्धा टाळला जातो. २००९ साली ही कल्पना सुचल्यानंतर तेव्हा पासून आजपर्यंत गुगल हा प्रयोग करत आहे.

गुगल यासाठी बकऱ्यांना पगार सुद्धा देतं बरं का. या बकऱ्या एका एजन्सीकडून मागवल्या जातात. बकऱ्यांचा सगळा पगार या एजन्सीला दिला जातो. बकऱ्यांनी पार्क मधील फक्त गवत खावं म्हणून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग आणि त्यांच्या देखरेखीसाठी एक गुराखी देखील नेमलेला असतो.

 

आणखी वाचा :

ज्योतिषाची काय गरज, आता चक्क गूगल सांगणार तुम्ही मरणार कधी ते !!

'आयआयटी मंडी'च्या ११ विद्यार्थ्यांनी पटकावली गूगलची शिष्यवृत्ती !!

नेटस्मार्ट : गुगल वर सर्च करण्याच्या १० अफलातून पद्धती !!

तुम्ही कुठं जाता याची सगळी माहिती गुगल मॅप्सकडे आहे. तुम्हीच पाहा गेल्या वर्षभरात तुम्ही कुठल्या ठिकाणांना भेट दिली ते...

 

सबस्क्राईब करा

* indicates required