ज्योतिषाची काय गरज, आता चक्क गूगल सांगणार तुम्ही मरणार कधी ते !!

माणसाला हे तर माहित असतं की तो एक ना एक दिवस मरणार आहे पण त्याला हे माहित नसतं की तो नेमकं कधी मरणार आहे. या प्रश्नाला आता चक्क गुगल उत्तर देईल राव.

गुगलने एक नवीन सॉफ्टवेअर शोधून काढलंय. या सॉफ्टवेअरमुळे गंभीर आजाराने पिडीत व्यक्ती किती काळ जगेल आणि त्याचा मृत्यू कधी होणार हे आधीच कळणार आहे. मंडळी, हे भाकीत जवळजवळ ९५% खरं असेल असा गुगलचा दावा आहे. चला तर या शोध विषयी आणखी वाचू !!

स्रोत

हे सॉफ्टवेअर अर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रणाली वापरून आपलं काम करणार आहे.

हे काम कसं करतं ?

मंडळी, रुग्णाची संपूर्ण माहिती या सॉफ्टवेअर मध्ये भरली जाते. रुग्णाचा आजार, त्याच्यावर झालेला उपचार, त्याचं वय, त्याला दिली जाणारी औषधे इत्यादींच्या आधारे हा रुग्ण पुढील २४ तासात जगू शकणार की नाही याबद्दल अंदाज बांधला जातो. जर रुग्ण दगावणार असेल तर तो किती काळ जगेल व जर बरा होणार असेल तर पुन्हा आजारी पडण्याची किती शक्यता आहे इत्यादी महत्वाच्या बाबी या सॉफ्टवेअरमुळे समजणार आहेत.

स्रोत

या सॉफ्टवेअरला ९५% खरा अंदाज कसा वर्तवता येतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून प्रत्येक लहानसहान गोष्ट तपासली जाते. डॉक्टरांनी नमूद केलेल्या लहानसहान नोट्स सुद्धा तपासल्या जातात.

शिकागो युनिवर्सिटी आणि सॅन फ्रान्सिस्को युनिवर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी मिळून हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

यशस्वी झालेला पहिला प्रयोग :

स्रोत

या तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग एका ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलेवर करण्यात आला. गुगलने या महिलेची संपूर्ण वैद्यकीय माहिती तपासून तिच्या जगण्याची शक्यता १९.९% असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अवघ्या १० दिवसात तिचा मृत्यू झाला.

मंडळी, यापूर्वी डॉक्टर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णाचं जीवनमान किती असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना यश आलं नाही. आता गुगलच्या या नव्या तंत्राने ते शक्य होईल असं दिसतंय.

सबस्क्राईब करा

* indicates required