computer

कॅमेरा लाव्हारसात बुडूनही सुखरूप वाचला..काय काय रेकॉर्ड झालंय पाहा.

लाव्हारसाची उष्णता ही ७०० ते १२०० डिग्री सेल्सियस एवढी प्रचंड असते. या उष्णतेच्या जवळपासही गेल्यास काय होईल याची तुम्ही कल्पना करूच शकता. एरिक स्टॉर्म हा पर्यावरण  मार्गदर्शक फक्त लाव्हारसाच्या जवळच गेला नाही, तर त्याने आपला महागडा कॅमेरा लाव्हारसात बुडू दिला. पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा.

एरिकने लाव्हारसाचं जवळून चित्रण करण्यासाठी आपला गोप्रो कॅमेरा एका लहानशा फटीत बसवला होता. पण अनपेक्षितपणे लाव्हारसाचा प्रवाह कॅमेऱ्याच्या दिशेने आला. कॅमरावर सुरक्षेसाठी केसिंग केलेली असली तरी कॅमरा पूर्णपणे लाव्हारसात सामावला होता, त्यामुळे कॅमेरा वाचण्याची शक्यता नव्हती. पण आश्चर्य म्हणजे कॅमेरा सुखरूप राहिला.

लाव्हारस थंड होऊन त्याचा दगड झाल्यानंतर एरिकने कॅमेरा बाहेर काढला. आतील एसडी कार्ड सुरक्षित होतं. लाव्हारसात बुडूनही कॅमरा शेवटपर्यंत रेकोर्ड करत होता हे आश्चर्यच म्हणावं लागेल. हे फोटो पाहा.

सबस्क्राईब करा

* indicates required