computer

व्हाट्सऍपला भारतीय पर्याय म्हणून येत आहे सरकारी संदेश. तुम्ही व्हाट्सऍपवरुन संदेशकडे वळणार का?

व्हाट्सऍप सारख्या सोशल मीडियाला भारतीय पर्याय असावा अशी मागणी आणि इच्छा बरेच दिवस व्यक्त केली जात आहे. अनेक तसे ऍप्स पण बाजारात येऊन गेले. पण व्हाट्सऍपला काय धक्का लागला नाही. आता मात्र थेट भारत सरकार ऍप घेऊन येत आहे.

संदेश नावाचे हे भारतीय ऍप आहे. ऍपल प्ले स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवर ते दाखल झाले आहे. फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हाट्सऍप आपल्या ताब्यात घेत एकप्रकारे मोठा सोशल मीडिया स्वतःकडे घेतला आहे. सरकारने आणलेले हे ऍप फेसबुकच्या याच मक्तेदारीला उत्तर ठरू शकते.

सध्या हे ऍप सरकारी कर्मचारी आणि सरकारशी निगडित एजन्सी वापरत आहेत. पण लवकरच कुणालाही हे ऍप मोबाईल नंबर टाकून वापरता येणार आहे. सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि आयटी विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत या ऍपबद्दल माहिती दिली आहे.

इतर सोशल मिडियांप्रमाणे संदेशही आपला डेटा क्लाउड सिस्टिममध्ये साठवणार आहे आणि ते ओपन सोर्सवर आधारित सुरक्षित ऍप आहे असे म्हटले जात आहे. हे ऍप सरकारकडून चालवण्यात येणार असून याचा पूर्ण कंट्रोल सरकारकडे असणार आहे. व्हाट्सऍपसारखेच फिचर यात असणार आहेत. व्हाट्सऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून देशभर गदारोळ झाला असताना हे ऍप येणे लोकांच्या फायद्याचे ठरणार आहे.

गुगल प्ले स्टोरवर या ऍपची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ये ऍप पूर्णपणे एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड असणार आहे. एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड मॅसेज, एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड बॅकअप आणि एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड ओटीपी अशा गोष्टींना हे ऍप आधार देते. तसेच या ऍपची प्रायव्हसी पॉलिसी ही सरकारी नियमांनुसार असणार आहे असेही सांगण्यात येते.

काय तर मग तुम्ही वापरणार का हे नवे संदेश ऍप?

सबस्क्राईब करा

* indicates required