computer

तुमची कोणती माहिती 'व्हॉटसअॅप'कडे आहे जाणून घ्या आणि ताबडतोब रिपोर्ट मागवा!!!

आता हे सर्वांनाच माहित झालेलं आहे की गुगल आणि फेसबुक तुमची माहिती जमा करतं, पण व्हॉटसअॅप पण तुमची माहिती जमा करतं हे तुम्हाला माहित आहे का ? तसं पाहायला गेलं तर व्हॉटसअॅपवर आपला भलताच विश्वास बसलेला आहे. त्याचं कारण म्हणजे व्हॉटसअॅप हे end-to-end encrypted आहे. म्हणजे तुमचे मेसेज कोणीच वाचू शकत नाही. अहो कोणीच काय स्वतः कंपनी पण वाचू शकत नाही.

राव, व्हॉटसअॅप एवढं विश्वासू असलं तरी आपली माहिती व्हॉटसअॅपकडे साठवली जाते हे आता उघड झालेलं आहे. पण सुदैवाने आपली कोणती माहिती व्हॉटसअॅपकडे आहे हे आपल्याला पाहता येतं. आज आम्ही तुम्हाला व्हॉटसअॅपकडे तुमची कोणती माहिती आहे हे पाहण्याची आयडिया सांगणार आहोत. चला तर सर्वात आधी व्हॉटसअॅप उघडा.

आत स्टेप-बाय-स्टेप पाहू.

१. सर्वात आधी व्हॉटसअॅपच्या उजव्या कोपऱ्यात जे तीन ठिपके दिसतात तिथे क्लिक करा. त्यानंतर सेटिंग सेक्शन मध्ये जा.

२. तिथे तुम्हाला Account लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.

३. त्यानंतर Request account info वर क्लिक करा.

४. तुमच्या समोर ‘Request Report’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला एक तारीख सांगण्यात येईल. त्या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या माहितीचा रिपोर्ट पाठवला जाईल.

तर, आता हे समजून घेऊया.

तुम्ही अशा प्रकारे तुमच्या अकाऊन्टची माहिती व्हॉटसअॅपकडून मिळवू शकता. व्हॉटसअॅपच्या म्हणण्याप्रमाणे ही माहिती तुम्हाला झिप (ZIP) फाईलच्या रूपाने ३ दिवसात पाठवली जाते. या रिपोर्ट मध्ये काय काय असतं ? तर, तुमचे मेसेजेस, फोटो, तुमच्या मोबाईल मध्ये असलेले संपर्क, ग्रुप्सची माहिती इत्यादी. तुमची जी माहिती व्हॉटसअॅपकडे आहे ती सर्व माहिती तुम्हाला पाठवली जाते.

लक्षात ठेवा.

राव, या ३ दिवसांमध्ये तुम्ही जर व्हॉटसअॅप नंबर बदलला किंवा फोन बदलला तर रिपोर्ट कॅन्सल होतो. त्यामुळे रिपोर्ट मागितल्यानंतर ३ दिवस या दोन्ही गोष्टी करू नका. याखेरीज लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे रिपोर्ट ३० दिवसांनी डिलीट केला जातो. ३० दिवसांच्या आत ती ZIP फाईल डाऊनलोड करा. या झिप फाईल मध्ये असलेली सगळीच माहिती तुमच्या मोबाईल मध्ये उघडणार नाही. जसे की HTML file. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या app ची गरज भासू शकते.

 

तर मंडळी, आता लगेचच हा प्रयोग करून पाहा. ३ दिवसांनी तुमच्याच लक्षात येईल की आपली किती माहिती व्हॉटसअॅपकडे पडून आहे ते.

सबस्क्राईब करा

* indicates required